Chhatisgarh Woman Physical Abused Sakal
देश

मनोरुग्ण महिलेवर बलात्कार; गुप्तांगात टाकला लोखंडी रॉड

सकाळ डिजिटल टीम

एका ५६ वर्षीय मनोरुग्ण महिलेवर बलात्कार (Chhatisgarh Woman Physical Abused) झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. नराधमाने तिच्यावर फक्त बलात्कारच केला नाहीतर तिच्या गुप्तांगामध्ये लोखंडी रॉड टाकला. तसेच मृत्यूनंतर अपघाताचा बनाव करण्यासाठी तिचा मृतदेह चिरडण्यात आला. छत्तीसगडमधील जॉजगीर चंपा जिल्ह्यात ही घटना घडली आहे.

छत्तीसगडमधील दाभ्रा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक मनोरुग्ण महिला राहत होती. तिच्या वडिलांचे आठ वर्षांपूर्वी निधन झाले. तसेच दोन वर्षांपूर्वी आईचा देखील मृत्यू झाला. तिच्या वडिलांसोबत काम करणारी एक सेवानिवृत्त महिला तिला जेवण देत होती. ही मनोरुग्ण महिला रात्री जेवण करून फूटपाथवर झोपली होती. त्यावेळी किशन यादव नावाच्या एका ३१ वर्षीय नराधमाने तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. त्यानंतर तिचे केस ओढून तिला जवळच्या बगीच्यामध्ये नेले. तिथे देखील तिच्यावर बलात्कार केला. पीडितेने विरोध केला असता तिच्या डोळ्यावर लाथ मारली. त्यानंतर तिच्या गुप्तांगामध्ये लोखंडी रॉड टाकला. यामध्ये महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर नराधमाच्या मनाला शांतात मिळाली नाही. त्याने अपघाताचा बनाव करण्यासाठी तिचा मृतदेह गाडीने चिरडला.

गेल्या ५ एप्रिलला महिलेचा मृतदेह आढळून आला होता. पण, हा अपघात असावा असे पोलिसांना वाटले. त्यानंतर त्यांनी तपास केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला होता. त्यानुसार महिलेवर बलात्कार झाल्याचे समोर आले. तसेच पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपीला अटक करण्यात आली. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून पुढील कारवाई सुरू आहे, असं पोलिस अधिकारी अभिषेक पल्लव म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT