Mercedes Accident in Delhi  Sakal
देश

भीषण अपघातात मर्सिडीजचा चुराडा; 2 ठार, 3 गंभीर जखमी

भरधाव वेगातील मर्सिडीज कारने ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने कारमधील 2 जण ठार तर 3 जण जखमी झाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

भरधाव वेगातील मर्सिडीज कारने ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कारमधील 2 जण ठार तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. दिल्लीतील (Delhi) कँट परिसरातील एका उड्डाणपुलावर हा अपघात (Accident) झाला. यामध्ये कारमधील दोन तरुणांचा मृत्यू झाला, तर तिघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाच तरुण मर्सिडीज (Mercedes) कारमधून प्रवास करत होते. फरिदाबादमध्ये एका लग्नात सहभागी होऊन परतत असताना 18 आणि 19 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 3.00 च्या सुमारास हा भीषण अपघात झाला. धौला कुआंहून पालमला जात असताना हा अपघात झाला. या अपघातात मर्सिडीज कारचे मोठे नुकसान झाले आहे. (Mercedes car accident with truck on Delhi's flyover, 2 killed, 3 in critical condition)

दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) दिलेल्या माहितीनुसार, पहाटे 2:50 वाजता उड्डाणपुलावर भरधाव वेगाने येत असलेली एक मर्सिडीज कार ट्रकला धडकली, अशी माहिती मिळाली. पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले तेव्हा मर्सिडीज कार उलटलेल्या अवस्थेत आढळून आली. पोलिसांनी तातडीने मर्सिडीजमधील पाचही तरुणांना बाहेर काढले आणि जवळच्या रुग्णालयात पाठवले. त्यापैकी विनोद आणि कृष्णा सोळंकी या दोघांना हॉस्पिटलमध्ये मृत घोषित करण्यात आले.

या अपघातावेळी पाच जण मर्सिडीजमधून प्रवास करत होते. त्यापैकी विनोद आणि कृष्णा सोळंकी या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर नितीन, जितेंद्र आणि करण भारद्वाज गंभीर असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. सीसीटीव्हीच्या मदतीने ट्रकचालकाचा शोध घेण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

छत्रपती शिवरायांचा इतिहास जगभर पोहोचणार, UNESCO यादीत पन्हाळगडाचा समावेश; पालकमंत्र्यांनी 'या' घटनेची करुन दिली आठवण

Latest Marathi News Updates : पन्हाळगडाचा जागतिक वारसा यादीत समावेश, कोल्हापूरसाठी गौरवाचा क्षण - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT