MHA Sakal
देश

MHA: अनुकंपा नियुक्ती धोरणात बदल, गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय

सुधारणा करण्यात आलेल्या तत्त्वांनुसार यामध्ये केंद्रीय निमलष्करी दलाच्या जवानांचा समावेश असणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : गृह मंत्रालयाने अनुकंपा नियुक्त्यांबाबतच्या धोरणात मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता सेवेत असताना मृत्यू झालेल्या आणि वैद्यकीय कारणास्तव निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनाही अनुकंपाद्वारे नियुक्ती मिळणार आहे. या धोरणामुळे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणार्‍या सर्व कर्मचार्‍यांना फायदा होण्याची अपेक्षा आहे. (MHA New Guidline For Compassionate)

सुधारणा करण्यात आलेल्या तत्त्वांनुसार यामध्ये केंद्रीय निमलष्करी दलाच्या जवानांचा समावेश असणार आहे. जे अनेकदा दहशतवादी हल्ले, चकमकी आणि आत्महत्यांसारख्या घटनांचे बळी पडतात. गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, अनुकंपापोटी नियुक्ती योजनेचा उद्देश सरकारी कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील आश्रित सदस्याला अनुकंपा तत्त्वावर नोकऱ्या उपलब्ध करून देणे हा आहे. या निर्णयामुळे संबंधित कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक चणचण आणि आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यास मदत होणार आहे.

नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार कुटुंबाच्या आर्थिक स्थितीचे एकूण मूल्यमापन, कमावणारे सदस्य, कुटुंबाचा आकार, मुलांचे वय इत्यादी बाबी विचारात घेऊन नियुक्ती करताना निर्णय घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वरील बदलामुळे अनुकंपा नियुक्ती प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि निष्पक्षता येईल असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

मध्यपूर्वेत तणाव वाढला, पुन्हा युद्धाला सुरुवात! अमेरिकेकडून १४० हून अधिक ठिकाणांवर हल्ले, इराणचंही प्रत्युत्तर...

INDW vs ENGW Test: जे सचिन, विराटला नाही जमलं, ते पोरीनं करून दाखवलं! यास्तिका भाटीयाने लॉर्ड्स कसोटीत इतिहास घडवला

Ashadhi Wari Accident Aid: आषाढी वारीतील अपघाती मृत्यू प्रकरणी चंद्रपूरच्या वारकऱ्याच्या वारसांना ४ लाखांची मदत; विठ्ठल रखुमाई वारकरी योजना २०२५ अंतर्गत मंजुरी

Latest Marathi News Update: सटाण्यात रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात

SCROLL FOR NEXT