UP CM Yogi Adityanath esakal
देश

UP Villages: योगींच्या यूपीत आणखी दोन गावांची नावं बदलली! एकाचा संबंध थेट म. गांधींच्या लढ्याशी

उत्तर प्रदेशात यापूर्वी अलाहाबाद, मुस्तफाबाद या जिल्ह्यांची नाव बदलण्यात आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

लखनऊ : उत्तर प्रदेशात शहरांची नावं बदलण्याचा ट्रेन्ड अजूनही सुरुच असून आता दोन गावांची नाव बदलण्याच्या निर्णय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्णयावर केंद्रीय गृहखात्यानं शिक्कामोर्तब केलं आहे. विशेष म्हणजे नाव बदलण्यात येणाऱ्या एका गावाचा संबंध महात्मा गांधींच्या लढ्याशी आहे. (MHA nod to change names of two places in UP Mundera Bazaar and Telia Afghan)

मुंदेरा बाझार या गावाचं नाव चौरीचौरा असं नामकरण होणार आहे तर तेलिया अफगाण या गावाचं नाव तेलिया शुक्ला असं करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहखात्यानं या नाव बदलाला मंजुरी दिली आहे. या दोन्ही गावांपैकी मुंदेरा बाझार हे गाव गोरखपूर जिल्ह्यात तर तेलिया अफगाण हे गाव देवरिया जिल्ह्यात आहे.

मुंदेरा बाझारचा म. गांधींशी संबंध

दरम्यान, यांपैकी मुंदेरा बाझार या गावाला मोठा इतिहास आहे. या गावाचा थेट संबंध महात्मा गांधी यांच्याशी आहे. चौरी चौरा घटनेच्या शंभर वर्षांनंतर आता हेच नाव मुंदेरा बाजारला नगर पंचायतीला देण्यात येणार आहे. चौरी चौरामध्ये झालेल्या शहीदांच्या सन्मानार्थ मुंडेरा बाझारचं नाव चौरी चौरा करण्यात आलं आहे.

४ फेब्रुवारी १९२२ रोजी चौरी चौरा इथं ब्रिटिश पोलिसांनी सत्याग्रहींच्या मोर्चावर गोळीबार केला होता. यामध्ये तीन जण शहीद झाले होते. यानंतर आक्रोशित सत्याग्रहींनी पोलीस स्टेशनलाच आग लावली होती. या घटनेत २३ पोलिसांना जीव गमवावा लागला होता. या घटनेनंतर महात्मा गांधी यांनी असहकार आंदोलन स्थगित केलं होतं.

विधानसभा मतदारसंघ चौरी-चौरा तर नगरपालिका मुंडेरा बाझार

यापूर्वी या विधानसभा मतदारसंघाचं नाव मुंडेरा बाझार होतं. २०१२ या निवडणुकीत या मतदारसंघाचं नाव बदलून चौरी-चौरा करण्यात आलं. तर इथल्या नगरपालिकेचं नाव अद्यापही मुंडेरा बझार असं आहे. हेच नाव बदलण्यासाठी योगी सरकारनं केंद्राकडं प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावाला केंद्रीय गृहखात्यानं ६ ऑक्टोबर रोजीच मंजुरी दिली. त्यानंतर आता ना हरकत प्रमाणपत्रही देण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Santosh Deshmukh Case: ''ते' व्हिडीओ पुन्हा-पुन्हा बघण्यासाठी आरोपींचा अट्टहास'', धनंजय देशमुखांनी उघड केली धक्कादायक बाब

Mumbai Local: दारात लटकण्याची सवय मोडणार! मुंबई लोकलमध्ये सुरक्षेचा ‘धनुष्यबाण’; नवीन दरवाज्याची नेमकी रचना कशी असणार?

W,W,W,1,W,W ! वर्ल्ड रेकॉर्ड; T20I मध्ये एकाच षटकात घेतल्या पाच विकेट्स; भारतीय गोलंदाजाने SMAT मध्ये केला होता असा पराक्रम

Latest Marathi News Live Update : रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवून सात लाखांची फसवणूक

BOX OFFICE: 'धुरंदर' ७०० कोटी पार पण मराठी सिनेमांची परिस्थिती काय? किती आहे 'उत्तर' आणि 'आशा' सिनेमाची कमाई?

SCROLL FOR NEXT