Gadkari: 6 Airbags Compulsory For all Cars Carrying Upto 8 Passengers Sakal
देश

चारचाकी वाहनचालकांसाठी महत्त्वाचे; नितीन गडकरींचा मोठा निर्णय

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : देशात रस्ते अपघाताचं प्रमाण सर्वाधिक आहे. बेदरकारपणे गाडी चालवणं, खराब रस्ते, वाहतुक नियमांचं पालन न करणं यामुळे अपघात होण्याचं आणि मृत्यू होण्याचं प्रमाणही अत्यंत जास्त आहे. वाहतुकीचे नियम पाळण्यासंदर्भात वेळोवेळी आवाहन करुनही अनेक वाहनचालक याकडे दुर्लक्ष करताना दिसतात. या पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Niting Gadkari) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. नितीन गडकरीयांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे. (6 Airbags Compulsory For all Cars Carrying Upto 8 Passengers)

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी ट्विट केलंय की, "मी 8 प्रवाशांपर्यंत वाहतूक करणाऱ्या मोटार वाहनांमध्ये किमान 6 एअरबॅग अनिवार्य करण्यासाठीच्या जीएसआर अधिसूचनेचा मसुदा आज मंजूर केला आहे.

आता कारमध्ये 6 एअरबॅग्स अनिवार्य (6 Airbags Compulsory For all Cars)

ज्या वाहनांमधून आठ प्रवासी वाहतुक होते अशा वाहनांमध्ये आता 6 एअरबॅग्स असणं अनिवार्य असणार आहे. प्रवास सुरक्षित होण्यासाठी सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. सामान्यत: मध्यमवर्गीय लोकांकडून लहान कार खरेदी केल्या जातात. यात साधारण दोन एअरबॅग्स असतात. ऑटोमेकर्स फक्त मोठ्या आणि महागड्या कारमध्येच जास्त एअरबॅग देतात. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याआधीच लहान आणि स्वस्त कारमध्येही सहा एअरबॅग्स देण्याचं आवाहन कार उत्पादक कंपन्यांना केलं होतं. भारतीय ग्राहकांची सर्वाधिक पसंती ही त्यांच्या बजेटमध्ये बसणाऱ्या कारला असते. या वाहनांमध्ये 6 एअरबॅग दिल्या गेल्या तर त्यांच्या किमती नक्कीच वाढण्याची शक्यता आहे. दोनपेक्षा जास्त एअरबॅगच्या संख्येत वाढ झाल्यामुळे किमतीत 8 ते 9 हजार रुपयांचा फरक पडू शकतो.

पाकिस्तान पुन्हा बनतोय 'दहशतवादाचा कारखाना'; जैश-लष्करचे तब्बल 300 नवे अड्डे उभारण्याची तयारी, कोण देतंय इतका पैसा?

Ganpati Bappa 2025: गणपती बाप्पाला दुर्वा का अर्पण करतात? जाणून घ्या कारण आणि महत्त्व

Supreme Court: प्रीमियम व्हिस्की खरेदी करणारे ग्राहक सुशिक्षित अन् जागरूक, सुप्रीम कोर्टाने असं का म्हटलं? प्रकरण काय?

Latest Marathi News Updates : नाशिकच्या कपालेश्वर मंदिरात पुन्हा दोन गटात वाद

कोकणच्या लाल मातीत कोरला दशावतार, संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपटाची जोरदार चर्चा!

SCROLL FOR NEXT