Ajay Bhatt Chant Modiji Zindabad Ukraine Evacuated Student e sakal
देश

युक्रेनमधून परतलेल्यांना मंत्री म्हणाले, 'मोदीजी जिंदाबाद म्हणा'; पण विद्यार्थ्यांनी...

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : युद्धग्रस्त युक्रेनमधून (Ukraine Russia War) मायदेशी परतणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसमोर केंद्रीय राज्यमंत्री अजय भट्ट (Minister Ajay Bhatt) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (PM Modi) कौतुक केले. त्यांनी या मुलांना ‘मोदी जी जिंदाबाद’ म्हणायला लावले. मात्र, मुलांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही. आम्हाला मायदेशी परतण्यासाठी अनेक संकटांचा सामना करावा लागलाय. त्यामुळे सरकारने स्वतःची पाठ थोपटून घेऊ नये, असं एक विद्यार्थिनी म्हणाली.

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन दिल्लीजवळील हिंडन एअरबेसवर चौथे विमान आले. यावेळी मंत्री अजय भट्ट यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सर्वांचे स्वागत करताना त्यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी प्रत्येक कामावर लक्ष ठेवून आहेत. आपल्याला पंतप्रधान मोदींसारखे नेतृत्व मिळाले नसते तर या देशाचे काय झाले असते माहिती नाही. मोदींच्या प्रयत्नांमुळे मुलांचे प्राण वाचले असून त्यांना मायदेशी परत येता आले, असं भट्ट यांनी सांगितलं. त्यानंतर ''भारत माता की जय'' आणि ''मोदी जी जिंदाबाद'' च्या घोषणा द्यायला लावल्या. विद्यार्थ्यांनी ''भारत माता की जय''च्या घोषणा दिल्या. पण, मोदींच्या घोषणेवेळी प्रतिसाद दिला नाही.

दरम्यान, पश्चिम युक्रेनमधील वसतिगृहाच्या खोलीत अडकलेल्या आणि २५ किमी पायी चालत सीमेवर पोहोचलेल्या 22 वर्षीय अनिमेश मिश्रा म्हणाला की, "याला सुखरूप बाहेर काढणे कसे म्हणायचे?" सरकार याला स्थलांतर म्हणत आहे, परंतु ते पश्चिमेत अडकलेल्या लोकांना आणत आहेत, जे आधीच सुरक्षित आहेत. पण, युक्रेनच्या विविध भाहातून जे सीमेवर पोहोचले आहेत ते स्वबळावर पोहोचले आहेत. त्यांना युक्रेनमध्ये मदत करायला कोणीच नाही.''

युक्रेन आणि रशियामध्ये आज नवव्या दिवशीही युद्ध सुरूच आहे. युक्रेनच्या अनेक शहरांवर बॉम्बहल्ले करण्यात आले असून त्याचे विदारक दृश्य समोर आले आहेत. काही इमारती बॉम्बहल्ल्यामुळे उद्ध्वस्त झाल्या आहेत. राजधानी किव्ह आणि खारकिव्ह हे दोन्ही शहरं धुमसत आहेत. याच शहरांमध्ये भारतीय विद्यार्थी अडकले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: रक्षाबंधनाआधी सोनं स्वस्त! सलग तिसऱ्या दिवशी भाव घसरले, आज 10 ग्रॅमचा दर किती?

Mumbai Local: कर्मचाऱ्यांना लागला लेटमार्क! मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल खोळंबल्याने प्रवाशांची तारांबळ

LUCKY ZODIAC SIGNS: फक्त ८ दिवस थांबा! ‘या’ ३ राशींचं नशीब अचानक पलटणार; पैसा, यश अन् मोठ्या फायद्याचे संकेत ,तुमची रास कोणती?

Marathi News Live Updates : मॉडिफाइड सायलेन्सरवर पोलिसांचा कडकडीत कारवाईचा बडगा, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या २२ दुचाकींवर दंडात्मक कारवाई

Sangola Water: पक्ष, गट, राजकारण बाजूला अन् शेतकरी एकवटले! सांगोल्यात पाण्याच्या लढ्याचा ‘सांगोला पॅटर्न’

SCROLL FOR NEXT