Narendra Modi Gajendra Shekhawat  esakal
देश

Narendra Modi : दलित-आदिवासींना नरेंद्र मोदी देवासमान वाटतात : मंत्री गजेंद्र शेखावत

जगभरात दिवसेंदिवस नरेंद्र मोदींचा प्रभाव वाढताना दिसत आहे.

सकाळ डिजिटल टीम

जगभरात दिवसेंदिवस नरेंद्र मोदींचा प्रभाव वाढताना दिसत आहे.

जगभरात दिवसेंदिवस नरेंद्र मोदींचा (Narendra Modi) प्रभाव वाढताना दिसत आहे. त्यातच आता केंद्रीय मंत्र्यानं मोदींबाबत मोठं वक्तव्य केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गरीब आणि दलित (Dalit Community) वर्गासाठी देवता समान आहेत, असं केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत (Gajendra Singh Shekhawat) यांनी म्हटलंय. शेखावत यांनी चित्तौडगड इथं "@20 सपने हुए साकार"मध्ये मोदी सरकारच्या योजनांवर भाष्य केलंय.

मोदींनी आठ वर्षांच्या कारकिर्दीत दलितांचं संपूर्ण आयुष्य बदललं, ते लोक मोदींकडं मसिहा म्हणून पाहत आहेत. पंतप्रधान मोदींच्या 8 वर्षांच्या शासन काळात ज्या लोकांच्या जीवनात परिवर्तन झालं आहे, त्यांना मोदी देवासमान वाटतात. संमेलनात उपस्थित असलेले आदिवासी वर्गातून येणारे, अनुसूचित जमाती अथवा दलित समाजातील लोक मोदींना सन्मान मिळवून देणारे देव पुरुष म्हणून पाहू लागले आहेत, असंही शेखावत यांनी स्पष्ट केलं.

विज्ञानाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या वैज्ञानिकांना पंतप्रधान मोदी वैज्ञानिक म्हणून अधिक वाटतात. तरुणांना स्टार्ट अपचे मार्गदर्शक तर ज्या लोकांना वीज आणि पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली, त्यांच्यासाठी मोदी एक साथी आहेत. एकूणच काय तर, ज्या लोकांनी मोदींना ज्या रुपात बघितलं मोदी त्यांना तसेच दिसून आले, असं सांगत शेखावात यांनी मोदींचं तोंडभरुन कौतुक केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT