M. Malla Reddy esakal
देश

मंत्री रेड्डींच्या ताफ्यावर हल्ला; मंत्र्याच्या दिशेनं भिरकावले बूट, दगड, खुर्च्या

सकाळ डिजिटल टीम

मंत्र्यानं मुख्यमंत्र्यांचं कौतुक करताच काही लोक मंचाकडं धावले आणि त्यांनी भाषण थांबवण्यास सांगितलं.

हैदराबाद : तेलंगणाचे कामगार मंत्री एम. मल्ला रेड्डी (M. Malla Reddy) यांच्या ताफ्यावर काही लोकांनी घाटकेसर इथं एका जाहीर सभेत हल्ला केलाय. ते थोडक्यात बचावले आहेत. दरम्यान, सभेसाठी जाणाऱ्या मंत्र्याच्या ताफ्यावर बूट, दगड आणि खुर्च्या फेकण्यात आल्यानं त्यांना अचानक सभा सोडावी लागलीय. रेड्डींनी सभेत तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) सरकार आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrasekhar Rao) यांचं कौतुक केलं होतं.

मंत्र्यानं मुख्यमंत्र्यांचं कौतुक करताच काही लोक मंचाकडं धावले आणि त्यांनी भाषण थांबवण्यास सांगितलं. काँग्रेसच्या (Congress) एका नेत्यानं रेड्डींना सरकारचं गुणगान थांबवून समाजाच्या भल्याचं बोला, असं सांगितलं. गदारोळ होत असताना आयोजकांच्या आवाहनानंतर मल्ला रेड्डींनी आपलं भाषण थांबवलं. मात्र, सभेदरम्यान काही काळ गोंधळ पहायला मिळाला.

मंत्री सतत सरकारचं गुणगान गात असताना सभेला उपस्थित असलेल्यांनी त्यांना अडवून त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. दरम्यान, संतप्त लोकांनी मंत्री रेड्डींचा ताफा कार्यक्रमस्थळावरून निघून जात असताना बूट, दगड आणि खुर्च्या फेकण्यास सुरुवात केली. त्यांच्यापैकी काहींनी ताफ्याचा पाठलागही केला. या बैठकीला विविध राजकीय पक्षांचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. रेड्डींच्या संयुक्त कृती समितीनं मुख्यमंत्र्यांनी 5,000 कोटी रुपयांसह रेड्डीज आयोग (Reddy's Commission) स्थापन करण्याचं त्यांचं निवडणूक आश्वासन पूर्ण करावं, अशी मागणी केलीय. मल्ला रेड्डी यांनी या हल्ल्यासाठी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष रेवंत रेड्डी (Revanth Reddy) यांना जबाबदार धरलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women T20 World Cup: T20 वर्ल्ड कप फायनलमध्ये टीम INDIA ची एन्ट्री पक्की? फक्त 'या' ३ गोष्टी आणि इतिहास घडणार!

NEET-UG पुनर्परीक्षेआधीच टोकाचं पाऊल; १७ वर्षीय विद्यार्थ्यानं सहाव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं

क्रीडा विश्वातील 'शू सायन्स': खेळाडूंच्या बुटांचे तळवे प्रत्येक खेळानुसार का बदलतात ? जाणून घ्या त्यामागचं विज्ञान!

Viral Video: ''सगळ्यांना पप्पा आहेत.. मम्मी म्हणत होती दारु पिऊ नका, पण तुम्ही ऐकलं नाही'', वडिलांच्या फोटोसमोर चिमुकलीची नाराजी

Latest Marathi News Live Update: ब्रम्हगाव प्रकरणातील मागण्या मान्य; भिमाशंकर यादव यांचे उपोषण स्थगित

SCROLL FOR NEXT