Smriti Irani vs Rahul Gandhi esakal
देश

Smriti Irani : 'कोर्टानं राहुल गांधींना 'या' कारणामुळं ठरवलं दोषी'; स्मृती इराणी स्पष्टच बोलल्या

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींवर (Rahul Gandhi) जोरदार निशाणा साधला.

सकाळ डिजिटल टीम

गांधी घराण्यानं आजपर्यंत पंतप्रधानांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्यांना यश आलं नाही.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींवर (Rahul Gandhi) जोरदार निशाणा साधला. त्या म्हणाल्या, 'पंतप्रधान मोदींचा अपमान करण्याचा प्रयत्न करत राहुल गांधींनी संपूर्ण ओबीसी समाजाचा (OBC Community) अपमान केलाय.'

गांधी परिवारानं दलित किंवा मागासवर्गीय लोकांचा अपमान करण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. आदिवासी समाजातील (Tribal Community) एक महिला राष्ट्रपती झाल्यावर गांधी कुटुंबाच्या सूचनेवरून काँग्रेस (Congress) सदस्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांचाही अपमान केला, असा आरोप इराणी यांनी केला.

केंद्रीय मंत्री म्हणाल्या, 'राहुल गांधी संसदेत पंतप्रधानांबाबत अपमानास्पद शब्द वापरतात आणि त्यांच्यावर आरोप करतात. परंतु, ते स्वतःच्या विधानाची सत्यता सिद्ध करू शकत नाहीत. कोर्टानं राहुल गांधींना एका व्यक्तीचा अपमान केल्याबद्दल नाही तर संपूर्ण समाजाचा अपमान केल्याबद्दल दोषी ठरवलंय.'

गांधी घराण्यानं आजपर्यंत पंतप्रधानांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्यांना यश आलं नाही. पंतप्रधान मोदींवरील सर्वसामान्यांचं प्रेम त्यांना कमी करता आलं नाही. राहुल गांधींची मानसिक स्थिती खराब झालीये म्हणून ते लंडनमध्ये जाऊन खोटं बोलत आहेत, असाही घणाघात त्यांनी राहुल गांधींवर केला. युवक काँग्रेसचे अध्यक्ष बी. वी. श्रीनिवास यांनी यापूर्वी स्मृती इराणी यांच्यावर हल्लाबोल करत त्यांना मूकबधिर म्हटलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT