toll naka Sakal
देश

गडकरींच्या टोल घोषणांवर महामार्ग विकास मंत्रालयाचे स्पष्टीकरण

2008 पूर्वीच्या टोलबाबत अभ्यास करावा लागेल असे महामार्ग विकास मंत्रालयाने म्हटले आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : टोल नाक्यांजवळ राहणार्‍या नागरिकांना पास देण्याचा प्रस्ताव विचारधीन असल्याची माहिती केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी (NItin Gadkari) यांनी मंगळवारी लोकसभेत बोलताना दिली होती. यावेळी त्यांनी इतरही काही घोषणा केल्या होत्या. तसेच 60 किलोमीटरच्या आत एकच टोलनाका असेल असे सांगत या अंतरात जर दुसरा टोल प्लाझा असेल तर, तो पुढील 3 महिन्यांत बंद केला जाईल, असेदेखील गडकरी लोकसभेत स्पष्ट केले होते. दरम्यान, गडकरी यांच्या या घोषणांनंतर केंद्रीय महामार्ग विकास महामंडळाने स्पष्टीकरण दिले असून, 2008 पूर्वीच्या टोलबाबत अभ्यास करावा लागेल असे महामार्ग विकास मंत्रालयाने स्पष्टीकरण देताना म्हटले आहे. (Ministry Of Highway Development On Nitin Gadkari Statement On Toll Pass)

टोलबाबतच्या बातमीवर केंद्रीय महामार्ग विकास महामंडळाने स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, स्थानिकांना टोलमधून सूट देण्याची मार्यादा 10 किमी अंतरापर्यंत असू शकते. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घोषणा आणि महामंडळाने दिलेले स्पष्टीकरण यामध्ये पुन्हा एकदा संभ्रम निर्माण होऊ शकतो. यावेळी 60 किलोमीटरच्या आत दोन टोलनाके नसतील या वक्तव्यावरदेखील महामार्ग विकास महामंडळाने स्पष्टीकरण दिले आहे.

नितीन गडकरी यांनी 60 किलोमीटरच्या आत एकच टोलनाका असेल असे सांगत या अंतरात जर दुसरा टोल नाका असेल तर, तो पुढील 3 महिन्यांत बंद केला जाईल, असे सांगितले होते. त्यावर यासाठी काही अपवाद आहेत का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावर स्पष्टीकरण देताना महामार्ग विकास महामंडलाने म्हटले आहे की, याला काही अपवाद आहेत आणि ते नक्कीच असू शकतात. याशिवाय 2008 सालातील जे टोल आहेत त्यासंबधीचे नियम नव्याने तयार करण्यात आलेले असून, त्यानंतरच 60 किमीची मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे. त्यापूर्वी जे टोल बांधलेले असतील त्यासाठी समितीला काही अभ्यास करावा लागेल असे मंत्रालयाने म्हटले आहे.

टोल नाक्यांजवळ राहणाऱ्या स्थानिकांना आधार कार्डच्या आधारावर पास दिले जातील असे देखील गडकरी यांनी लोकसभेत बोलताना सांगितले होते. त्यावर स्पष्टीकरण देताना असे सांगण्यात आले आहे की. महापालिका क्षेत्रामधील असणाऱ्या टनल, टोल, ब्रिज आदींसाठी कोणत्याही प्रकारची टोल सवलत दिली जाणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच ही सवलत केवळ ग्रामीण भागातील नागरिकांसाठी असेल. जिथे कमीत-कमी पाच किमी आणि जास्तीत जास्त 10 किमीच्या गावांसाठी पासची ही सुविधा उपलब्ध असेल असे सांगण्यात आले आहे.

म्हणून अमेरिका समृद्ध

यावेळी गडकरी म्हणाले होते की, भारताला समृद्ध करण्यासाठी, डिसेंबर 24 पूर्वी भारतातील रस्ते पायाभूत सुविधा अमेरिकेसारख्या (America Infrastructure) असतील. या संदर्भात त्यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांच्या प्रसिद्ध कोटाचा संदर्भ देत सांगितले की, "अमेरिकन रस्ते चांगले नाहीत कारण अमेरिका समृद्ध आहे, परंतु अमेरिका समृद्ध आहे कारण अमेरिकन रस्ते चांगले आहेत".

सहा एअरबॅग बंधनकारक

गडकरी म्हणाले की, रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने 8 प्रवासी घेऊन जाणाऱ्या प्रत्येक वाहनांमध्ये 6 एअरबॅग (AirBag) असणे बंधनकारक केले आहे. या निर्णयानंतर वाहन उद्योगाने खर्च वाढल्याची तक्रार केली आहे. परंतु गरीब ग्राहकांच्या जीवावर आम्ही श्रीमंतांचे संरक्षण करणार नसल्याचे गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT