देश

Baba Ramdev: माफीचा आकार जाहिराती एवढा मोठा होता का? बाबा रामदेवांना सर्वोच्च न्यायालयाचा सवाल!

Baba Ramdev: पुढील सुनावणी ३० एप्रिलला होणार असून सुनावणीदरम्यान बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांनाही न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Sandip Kapde

Baba Ramdev: रामदेव बाबा यांना सुप्रीम कोर्टाने चांगलेच फटकारले आहे. पतंजली आयुर्वेदच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीवरील सुनावणीदरम्यान कोर्टाचा अपमान केल्याप्रकरणी खंडपीठाने तिव्र शब्दात बाबा रामदेव यांना खडसावले. न्यायमूर्ती हिमा कोहली आणि अहसानुद्दीन अमानुल्ला यांच्या खंडपीठाने बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांना थेट प्रश्न विचारले.

पुढील सुनावणी ३० एप्रिलला होणार असून  सुनावणीदरम्यान बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांनाही न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पंतजलीने ६७ वृत्तपत्रांमध्ये माफीनामा प्रसिद्ध केला. यावर खंडपीठाने नाराजी व्यक्त केली.

खंडपीठाने रामदेव आणि बाळकृष्ण यांना तुमची जाहिरात कुठून प्रसिद्ध केली आणि एवढा वेळ का लागला, अशी विचारणा केली. या जाहिराती एकाच आकाराच्या होत्या, तुम्ही नेहमी एकाच आकाराच्या जाहिराती देता का?

यावर रामदेव यांच्या वकिल म्हणाले, नाही सर.. त्याची किंमत खूप जास्त आहे.. लाखो रुपये...आम्ही माफीनामा प्रसिद्ध केला आहे, जाहिरात नाही.

पतंजली प्रकरणात कोर्ट काय म्हणत आहे ते टीव्ही चॅनेल्सवर दाखवले जात असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. त्याचबरोबर पतंजलीची जाहिरातही एका भागात चालवली जात आहे. हे प्रकरण केवळ पतंजलीचे नाही, तर इतर कंपन्यांच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींचेही आहे. जे प्रकाशित होते त्यापेक्षा तुम्हाला कमाईची जास्त काळजी वाटत नाही का?, असा प्रश्न कोर्टाने उपस्थित केला.

आम्हाला एक अर्ज आला आहे, ज्यामध्ये पतंजलीविरोधात अशी याचिका दाखल केल्याबद्दल आयएमएला 1,000 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. असे दिसते की, ही तुमच्या वतीने प्रॉक्सी याचिका आहे, असे कोर्टाने विचारले. यावर रामदेव यांचे वकील मुकुल रोहतगी म्हणाले की, माझा याच्याशी काहीही संबंध नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: प्रयोग थांबणार अन् न्यूझीलंडविरुद्धच दिसणार भारताची World Cup ची संभावित प्लेइंग-११? कर्णधार शुभमन गिलचे संकेत

France Student Protests : फ्रान्समधील विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण; ४ हजार जणांना अटक, २०० जण जखमी

विद्युत खांबावरील स्पार्किंगमुळे आग; ४ एकर ऊस, सोलार व ठिबकचे साहित्य जळून खाक, शेतकरी उद्ध्वस्त

Irani Cup 2026: रिषभ पंतच्या नेतृत्वातील संघ ठरला चॅम्पियन! फायनलमध्ये रणजी ट्रॉफी विजेत्यांना केलं पराभूत

भाकरीसोबत तोंडाला पाणी आणणारी गोळ्याची आमटी; पाहा खानदेशी पद्धतीची रेसिपी; GOLYACHI AAMTI RECIPE

SCROLL FOR NEXT