harnaz kaur
harnaz kaur google
देश

ट्रान्सजेंडरने केला 'मिस युनिव्हर्स' हरनाज संधूचा 'विनिंग गाऊन' डिझाईन

सकाळ डिजिटल टीम

'मिस युनिव्हर्स २०२१' (Miss Universe 2021) या अत्यंत प्रतिष्ठित सौंदर्यस्पर्धेत भारताच्या हरनाज संधूने (Harnaaz Sandhu) बाजी मारली . ग्रॅंड फिनालेमध्ये हरनाजने सी-थ्रू एम्बेलिश्ड गाऊन घातला होता. हरनाजनच्या या गाऊनची सोशल मिडियावर बरीच चर्चा झाली. मात्र हा गाऊन कोणी डिझाइन केला होता माहित्येय का?

हरनाजचा गाऊन फॅशन डिझायनर सायशा शिंदेनी तिचा गाऊन डिझाइन केला होता. सायशा ट्रान्सजेंडर असून जानेवारी २०२१ मध्ये ती स्वप्निल शिंदेची सायशा शिंदे झाली. त्यानेच इंस्टाग्राम अकाउंटवरून ही माहिती देत आता त्याची ओळख सायशा शिंदे असल्याचे जाहीर केले होते. त्यावेळी त्याची चांगलीच चर्चा झाली होती. आता पुन्हा इंडस्ट्रीत त्याच्या नावाची चर्चा सुरू आहे. सायशाने करिना कपूर, श्रद्धा कपूर, अनुष्का शर्मा आदी अभिनेत्रींचे कपडे डिझाईन केले आहेत.

गाऊनविषयी...

मिस युनिव्हर्ससाठी हरनाजने बेज आणि चांदीचा नक्षीदार गाऊन परिधान केला होता. त्यात प्लंगिंग व्ही-नेकलाइन ,शॉर्ट स्लीव्ह्ज होते. त्यात फिगर-स्किमिंग सिल्हूट, मरमेड-स्टाईल फॉल, प्लंगिंग-व्ही नेकलाइन आणि सिल्व्हर टेसेल्स लावले होते.

सायशाची पोस्ट

हरनाजने मिस युर्निव्हर्सचा किताब पटकावल्यावर सायशाने इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट लिहीत हा गाऊन तयार होत असतानाचा फोटो शेअर केला आहे. त्यात तिने म्हटरे की, की खूप जास्त टेन्शन होतं मला, रात्रीची झोप उडाली होती माझी, मी एका सुंदर मुलीचा ड्रेस डिझाईन करताना एका महिलेची कसोटी होती. हा ड्रेस मिस युनिव्हर्स २०२१ साठीच लायक होता. थेट मिस युर्निव्हर्ससाठी ड्रेस डिझायन केल्यामुळे सायशा पुन्हा चर्चेत आली आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: 'महाराष्ट्रात का नाही दिला एकही मुस्लिम उमेदवार...', काँग्रेस नेते नसीम खान यांचा मविआला सवाल

'माझ्यासोबत राहा अन् मुलांना जन्म दे', दहशतवाद्यानं अंगठी देत केलं प्रपोज, हमासच्या कैदेतील तरुणीची आपबीती

Latest Marathi News Live Update: झारखंडमध्ये स्कूलबसचा मोठा अपघात

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

SCROLL FOR NEXT