देश

आमदार ऐहोळेंनी आगारप्रमुखांवर उगारला हात

सकाळवृत्तसेवा

रायबाग - राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या जयंतीदिनी रायबागचे आमदार दुर्योधन ऐहोळे यांनी बस डेपो व्यवस्थापकाच्या अंगावर धावून गेल्याची घटना रायबाग येथे मंगळवारी घडली. सोमवारी आमदार सतीश जारकीहोळींच्या समर्थकांनी चन्नम्मा विद्यापीठाच्या कुलगुरूंना धक्काबुकी केल्याची घटना ताजी असताना आमदार ऐहोळे यांच्या ‘कामगिरी’ने राजकीय वर्तुळात चर्चेला वेग आला आहे.

महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त स्वच्छ भारत अंतर्गत नगर पंचायतीतर्फे बसस्थानकावर कार्यक्रम होता. आमदार ऐहोळे बस स्थानकाकडे गेले. पण तेथे फक्त नगरपंचायतीचे स्वच्छता कर्मचारी होते. बस स्थानक परिसरात खासगी वाहतुकीची वाहने लावली होती. कार्यक्रम असल्याचे कळवूनही डेपो व्यवस्थापक ए. आर. छबी हजर नसल्याने आमदारांना राग आला.

व्यवस्थापकांनी कार्यक्रमस्थळी येण्यास एक तास उशीर केल्याने आमदार ऐहोळे यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले. विविध आरोप करत वरिष्ठांना तक्रार करणार असल्याचे सांगत त्यांच्या अंगावर धावून गेले, पण तेथे असणाऱ्यांनी आमदारांना आवरल्याने पुढील घटना टळली. हे सर्व काही लोकांच्या व पत्रकारांच्या समक्षच सुरू होते. व्यवस्थापक खासगी वाहने बसस्थानकात लावण्यासाठी पैसे घेत असल्याचा आरोप आमदार ऐहोळे यांनी केला. आमदारांच्या या रौद्ररूपापुढे बस डेपो व्यवस्थापक मात्र शांतच उभे होते.

कार्यक्रमाबाबत मला माहिती नव्हती. डेपोतील गांधी जयंती कार्यक्रम आटोपून मी स्वच्छता कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलो. पण आमदारांनी काही ऐकून न घेता आरोप करत आपल्या अंगावर येऊन हात उगारला. कंपाऊंड नसल्यामुळे स्थानकात खासगी वाहनधारकांची मनमानी असते. पोलिस तक्रार घेत नाहीत. राजकारणीच वाहनचालकांना संरक्षण देतात.
- ए. आर. छबी,
रायबाग डेपो व्यवस्थापक

गांधी जयंतीनिमित्त रायबाग आगारात स्वच्छता कार्यक्रम होता. तेथे डेपो व्यवस्थापक वेळेवर आले नाहीत. स्थानकात ४० हून अधिक खासगी वाहने होती. त्यामुळे कार्यक्रमाला जागाच नव्हती. फोन केला तरी ते उचलत नव्हते. त्यामुळे मी त्यांना ताकीद दिली. हात उगारला नाही की धक्‍काबुक्‍कीही केली नाही.
- दुर्योधन ऐहोळे,
आमदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT