Model Divya Pahuja Shot Dead In Gurugram 
देश

गँगस्टर, प्रेमिका, एनकाऊंटर अन् बदला! 27 वर्षीय मॉडेलची जामिनावर असताना गोळ्या घालून हत्या

Model Divya Pahuja Shot Dead In Gurugram Hotel : २७ वर्षीय मॉडेल आणि गँगस्टर संदीप गडोलीची गर्लफ्रेंड दिव्या पहुजा हिची हरियाणाच्या गुरुग्राममध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- २७ वर्षीय मॉडेल आणि गँगस्टर संदीप गडोलीची गर्लफ्रेंड दिव्या पहुजा हिची हरियाणाच्या गुरुग्राममध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे दिव्या पहुजा हिला सात वर्षाचा तुरुंगवास झाला असून ती जामीनावर बाहेर होती. बुधवारी रात्री गुरुग्रामच्या एका हॉटेलमध्ये तिला संपवण्यात आलंय.(Model Divya Pahuja Shot Dead In Gurugram Hotel Was Jailed For Role In Gangster Killing)

२०१६ मध्ये दिव्याचा अंडरवर्ल्डशी संबंध आला. त्यावेळी ती केवळ १८ वर्षांची होती. मोस्ट वाँटेड गँगस्टर संदीप गडोली याच्या खोट्या एनकाऊंटर प्रकरणात पोलिसांनी तिला अटक केली होती. मुंबईच्या अंधेरीतील हॉटेलमध्ये आला असताना पोलिसांनी २०१६ मध्ये गडोलीचा एनकाऊंटर केला होता. त्यावेळी दिव्या देखील त्याठिकाणी उपस्थित होती. हा एनकाऊंटर हरियाणा पोलिसांनी केला होता. त्यांनतर काही पोलीस आणि दिव्या हिची अटक झाली होती.

सात वर्षाची शिक्षा भोगल्यानंतर दिव्याला मुंबई हायकोर्टाने जून २०२३ मध्ये जामीन मंजूर केला होता. पण, तिच्या मागील संकट टळलं नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेल मालक आणि त्याच्या दोन कर्मचाऱ्यांनी तिला हॉटेलमध्ये गोळी घातली. या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली आहे.

हॉटेल मालक अभिजित सिंग याने सांगितलं की, दिव्या काही अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत होती आणि त्याबदल्यात पैसे मागत होती. त्यामुळे त्याने दोन साथीदारांच्या मदतीने तिला गोळी घातली. दिव्याच्या कुटुंबियांनी हा दावा फेटाळला आहे.

दिव्याची बहीण नैना हिने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. तिने या हत्येमागे गडोली कुटुंबियांचा हात असल्याचा आरोप केला आहे. संदीप गडोलीची बहीण सुदेस कटारिया आणि भाऊ ब्राहम प्रकाश कटारिया यांनी तिला संपवण्यासाठी अभिजित सिंगला पैसे दिल्याचा दावा नैना हिने केलाय. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय की, अभिजित सिंग त्याच्या दोन मित्रांसह दिव्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नगर पंचायत निवडणुकांच्या हालचालींना वेग; फेब्रुवारी २०२७ मध्ये संपणार मुदत; प्रभाग रचनेचा कार्यक्रम लागणार?

IND vs SL Test: भारतीय संघ ९ वर्षांनी श्रीलंकेत कसोटी खेळणार! कधी होणार सामने? तारखेबाबत मोठी अपडेट

Pune Crime : खराडीत अल्पवयीन मुलीचा बालविवाह; पतीसह नऊ जणांवर गुन्हा दाखल

Municipal School : महापालिकेच्या पाच शाळांचे खासगीकरण; नऊ वर्षांत मोजणार १०१ कोटी रुपये

Pune Road Crash: मुंढव्यात भरधाव डंपरची दुचाकीला धडक; २८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू, चालक फरार

SCROLL FOR NEXT