Prime Minister Narendra Modi announcing India’s first Made in India semiconductor chip to be launched by year-end. sakal
देश

Made in India semiconductor chip: मोदींची मोठी घोषणा! '’वर्षअखेरीस पहिली ‘मेड इन इंडिया’ सेमीकंडक्टर चिप बाजारात येणार'’

Modi announcement : मेड इन इंडिया 6जी नेटवर्क विकसित करण्यासाठी सरकार वेगाने काम करत असल्याचेही मोदींनी सांगितले

Mayur Ratnaparkhe

PM Modi announces Made in India semiconductor: भारतात उत्पादित होणाऱ्या पहिल्या मेड इन इंडिया सेमीकंडक्टर चिपबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी मोठी घोषणा केली. २०२५ च्या अखेरीस पहिली मेड इन इंडिया सेमीकंडक्टर चिप बाजारात उपलब्ध होईल, असं मोदी म्हणाले. तसेच, मेड इन इंडिया 6जी नेटवर्क विकसित करण्यासाठी सरकार वेगाने काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

यावेळी मोदी म्हणाले, "या वर्षाच्या अखेरीस पहिली स्वदेशी विकसित सेमीकंडक्टर चिप बाजारात येईल." इकॉनॉमिक टाईम्स वर्ल्ड लीडर्स फोरम २०२५ मध्ये भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारताने दशकांपूर्वी देशांतर्गत सेमीकंडक्टर तयार करण्याची संधी गमावली होती, परंतु आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले, "आपल्या सर्वांना माहित आहे की सेमीकंडक्टर उत्पादन ५०-६० वर्षांपूर्वी भारतात सुरू होऊ शकले असते, परंतु भारताने ती संधी गमावली आणि तीच परिस्थिती बराच काळ चालू राहिली. मात्र आज आपण ही परिस्थिती बदलली आहे. भारतात सेमीकंडक्टर कारखाने सुरू होऊ लागले आहेत.''

याशिवाय भारत लवकरच इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) क्षेत्रात एक मोठी शक्ती बनणार आहे. भारत आता जगातील १०० देशांमध्ये इलेक्ट्रिक वाहने निर्यात करणार आहे. या यशाशी संबंधित एक खूप मोठा कार्यक्रम मंगळवारी (२६ ऑगस्ट) दोन दिवसांनी आयोजित केला जात आहे." अशीही माहिती मोदींनी दिली.

 तसेच  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरसंचार तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात होत असलेल्या प्रयत्नांवरही यावेळी प्रकाश टाकला. "आम्ही मेड इन इंडिया 6जी नेटवर्क विकसित करण्यासाठी वेगाने काम करत आहोत. जगात होत असलेल्या प्रगतीशी जुळवून घेण्यावर सरकारचे लक्ष आहे." असंही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Pub Raid : पुण्यात पबमध्ये अल्पवयीन मुलांना मद्य विक्री? मनविसे ने बंद पाडली फ्रेशर्स पार्टी, अर्ध्या रात्री नेमकं काय घडलं?

Pune Rain Alert : घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा 'येलो अलर्ट'

Latest Marathi News Updates : पुण्यात घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी आज जोरदार पावसाची शक्यता

एकल फौज आणि विसंगतीपूर्ण हिंसा

मोठी बातमी! सततच्या पावसामुळे नुकसान झाले तरच शेतकऱ्यांना मिळणार भरपाई; सततचा पाऊस म्हणजे काय?, सोलापुरातील ‘या’ ३ तालुक्यातच अतिवृष्टी झाल्याची नोंद

SCROLL FOR NEXT