Mallikarjun Kharge Esakal
देश

Loksabha 2024: दोन कोटी नोकऱ्या देण्याची मोदी सरकारची गॅरंटी युवकांसाठी दु:स्वप्नासारखी: मल्लिकार्जुन खर्गे   

Mallikarjun Kharge: "आयआयटी, आयआयएम सारख्या संस्थांची अशी भीषण अवस्था आहे. यातून भाजपने युवकांचे भविष्य कसे खराब केले आहे, याची कल्पना येते शकेल.’’

सकाळ वृत्तसेवा

सकाळ न्यूज नेटवर्क


भाजपने लादलेली बेरोजगारी हा यंदाच्या निवडणुकीतील सर्वांत मोठा मुद्दा असल्याचा दावा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी रविवारी सोशल मीडियाद्वारे केला. आयआयटी, आयआयएम यांच्यासारख्या प्रतिष्ठित शिक्षण संस्थांमध्ये शिकून बाहेर पडणाऱ्या असंख्य युवकांना नियमित नोकरी मिळत नसल्याचेही खर्गे म्हणाले.

मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले,‘‘देशातील युवकांना रोजगार प्राप्तीसाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. मोदी सरकारच्या काळात बेरोजगारीचा दर तिपटीने वाढला आहे. दोन कोटी नोकऱ्या देण्याची मोदी सरकारची गॅरंटी युवकांसाठी एका दु:स्वप्नासारखी ठरली आहे. देशातील किमान १२ आयआयटी अशा आहेत की त्यातून शिकून बाहेर पडलेल्या तीस टक्के युवकांना नोकऱ्या मिळालेल्या नाहीत. तर, २१ ‘आयआयएम’मधील केवळ २० टक्के प्लेसमेंट पूर्ण झाले आहे. आयआयटी, आयआयएम सारख्या संस्थांची अशी भीषण अवस्था आहे. यातून भाजपने युवकांचे भविष्य कसे खराब केले आहे, याची कल्पना येते शकेल.’’

वर्ष २०१२ ते २०१९ या कालावधीत रोजगारवाढीचा दर केवळ ०.०१ टक्के इतकाच होता, असे सांगून खर्गे म्हणाले,‘‘केंद्रात काँग्रेसचे सरकार आल्यास युवा न्याय मोहिमेतंर्गत युवकांना रोजगार देण्याच्या मार्गातले अडथळे दूर केले जातील. २५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या पदवी अथवा पदविकाधारकांना रोजगार मागण्याचा कायदेशीर अधिकार दिला जाईल. अशा युवकांना प्रतिवर्ष किमान एक लाख रुपये दिले जातील. यामुळे काम आणि शिकण्याला वेगळे करणारी बाधा नाहिशी होईल.’’

‘कलम ३७०’वरून भाजपची टीका

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शनिवारी राजस्थानमध्ये केलेल्या एका विधानावरून भाजपने त्यांच्यावर आज टीकास्त्र सोडले.

खर्गे म्हणाले होते की, पंतप्रधान मोदींना कलम ३७० बद्दल बोलायचे तर त्यांनी जम्मू-काश्‍मीरला जावे. राजस्थानमध्ये बोलून काय फायदा? ‘खर्गे यांचे हे विधान म्हणजे देशाच्या एकतेवर घाला आहे,’ अशी टीका भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी केली आहे. काँग्रेसने कधीही जम्मू-काश्‍मीरला भारताचा भाग मानले नाही, असा आरोपही त्यांनी केला.

खर्गे यांचे हे विधान म्हणजे देशाचे विभाजन करण्याची त्यांची मानसिकता असल्याचेच दिसून येत असल्याचा दावा सुधांशू त्रिवेदी यांनीही केला. शनिवारच्या भाषणात खर्गे यांनी ‘कलम ३७०’ ऐवजी ‘कलम ३७१’ असा उल्लेख केला होता. त्यावरूनही आज केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी खर्गेंवर टीका केली.

खर्गे चुकून बोलले : रमेश

मल्लिकार्जुन खर्गेंनी ‘कलम ३७०’ ऐवजी चुकून ‘कलम ३७१’ असा उल्लेख केल्यानंतर काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी सारवासारव केली. ते म्हणाले,‘‘काँग्रेसच्या अध्यक्षांना कलम ३७० असेच म्हणायचे होते. ते चुकून कलम ३७१ असे बोलले; मात्र यातूनही त्यांनी मोदी-शहांचा छुपा अजेंडा उघड केला आहे. कारण कलम ३७१ हे नागालँड, आसाम, मणिपूर, आसाम, मिझोराम आणि अरुणाचल प्रदेशशी संबंधित आहे. यातही बदल करायचा भाजपचा हेतू आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Violence : बाजूलाच सर्किट बेंच, वीज खंडित, प्रचंड गोंधळ, तलवारी, पोती भरून दगडं; अपुरी पोलिस यंत्रणा, कोल्हापुरात दोन गटातील राड्याचा घटनाक्रम असा...

Toll Free Scheme: ‘समृद्धी’वर चाचणीतच कटला ईव्ही वाहनांचा टोल! शासनाची घोषणा ठरली फोल, तांत्रिक अडचणी पाठ सोडेनात

Dhanashree Verma च्या सपोर्टमध्ये उतरली सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा; म्हणाली, तुझ्या प्रती आदर...! नेटिझन्स म्हणायला लागले....

Latest Marathi News Updates : कोल्हापुरात सध्या तणावपूर्ण शांतता

PMC News : महापालिकेची मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी कडक पावले; १७ हजार कोटी रुपये अद्याप येणे, महापालिकेकडून विविध उपाययोजनांवर भर

SCROLL FOR NEXT