Randeep Surjewala on Modi Government 
देश

"ब्रिटिशांप्रमाणं मोदी सरकार काम करतंय"; ईडी नोटीशीनंतर काँग्रेसचा संताप

राहुल, सोनिया गांधींवरील ईडी नोटीशीनंतर मोदी सरकारवर केला घणाघाती आरोप

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांनी नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात ईडीनं नोटीस पाठवली असून चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. यानंतर काँग्रेस चांगलीच संतापली असून काँग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकार सुडाचं राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. (Modi govnt works like British Congress angry after ED notice to Sonia Gandhi Rahul Gandhi)

ईडीनं सोनिया गांधी यांना ८ जून रोजी हजर राहण्याचे निर्देश दिलेत तर राहुल गांधी यांना २ जून रोजी हजर राहण्यास सांगितलं आहे. दरम्यान, काँग्रेसचे वरिष्ठ नेते अभिषेक मनु सिंघवी आणि रणदीप सुर्जेवाला यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांचे नेते ईडीसमोर कधी हजर होतील याची माहिती दिली. राहुल आणि सोनिया गांधी हे दोघेही ८ जून रोजी हजर राहतील. सोनिया गांधी तर हजर होतीलच पण राहुल गांधी सध्या परदेशात आहेत. ते जेव्हा भारतात परततील तेव्हा त्यानुसार ईडी चौकशीची तारीख ठरवेल, अशी माहिती अभिषेक मनु सिंगवी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नॅशनल हेरॉल्डचा मुद्दा वारंवार उपस्थित करुन भाजप स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान करतंय. ज्यांचा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात काहीही सहभाग नाही. नॅशनल हेरॉल्ड हे वर्तमानपत्र १९४२ मध्ये सुरु झालं होतं. त्यावेळी ब्रिटिंशांनी त्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. ब्रिटिश सरकारप्रमाणंच मोदी सरकारही काम करत आहे, अशा शब्दांत सुर्जेवाला यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. ज्या प्रकरणात कुठलाच आर्थिक घोटाळा झालेला नाही त्याच आर्थिक गैरव्यवहाराची केस चालवण्यात येत आहे. याद्वारे भाजपकडून सूडाचं राजकारण, भीती आणि खालच्या दर्जाचं राजकारण करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Boycott: विकासाच्या बदल्यात फसवणूक? नवी मुंबईतील २७ गावांचा निवडणूकीवर बहिष्कार, राजकारण्यांच्या आश्वासनांचा अखेर कंटाळा

PM मोदी ख्रिसमसनिमित्त गेले चर्चेमध्ये, प्रभू येशूसमोर केली प्रार्थना; पाहा Video

धक्कादायक! पतीच्या छळाला कंटाळून नवविवाहितेनं घेतला गळफास; महिन्यापूर्वीच झालं होतं लग्न, नवऱ्यानं असं काय केलं?

CM Yogi Adityanath: दूरदृष्टीचा नेता आणि कवी मनाचा पंतप्रधान..! अटलजींच्या जन्मशताब्दीनिमित्त CM योगी आदित्यनाथ यांनी सांगितली आठवण

Ichalkaranji Election : दोन दिवसांत एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही; मात्र इचलकरंजीत अर्जांसाठी प्रचंड झुंबड

SCROLL FOR NEXT