Esakal
देश

Modi Guarantee: "मोदींची गॅरंटी हा निवडणूक विजयाचा फॉर्म्युला नव्हे तर..."; PM मोदींनी स्पष्टच सांगितलं

विरोधकांच्या बेरोजगारी आणि महागाईबाबतच्या आरोपांनाही पंतप्रधानांनी उत्तर दिलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : मोदींची गॅरंटी म्हणजे निवडणूक विजयाचा फॉर्म्युला नव्हे तर गरिबांना दिलेली वचनपूर्ती आहे, असं खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं यावेळी त्यांनी विरोधकांच्या आरोपांना सविस्तर उत्तरं दिली. (Modi Guarantee Is Trust Of Poor Not Formula For Election Victory says PM Modi at Interview)

गरिबांचा विश्वास ताकद वाढवतो

मोदी म्हणाले, गरिबांचा आपल्यावर असलेला विश्वास आपला लढण्याची ताकद देतो. मोदींची गॅरंटी हा निवडणूक जिंकण्याचा फॉर्म्युला नाही तर गरिबांच्या विश्वासाची पूर्तता आहे. सध्या देशातल्या प्रत्येक गरिबाला माहितीए की मोदी कधीही आपल्या कर्तव्यापासून मागे हटणार नाही. त्यामुळं त्यांच्या विश्वासाला माझ्याकडून कधीही तडा जाणार नाही. (Marathi Tajya Batmya)

'मोदी की गॅरंटी' कॅम्पेन

नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी 'मोदी की गॅरंटी' हे कॅम्पेन चालवलं होतं. याचं जोरावर भाजपनं राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसला पराभूत केलं होतं. तर मध्य प्रदेशात मोठा विजय मिळवला होता. तर तेलंगाणात आपली कामगिरी सुधारली होती. (Latest Marathi News)

विरोधकांच्या आरोपांना दिलं उत्तर

विरोधकांकडून सध्या देशातील बेरोजगारी आणि महागाईच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारला घेरलं आहे. विरोधकांच्या या आरोपांनाही मोदींनी मुलाखतीत उत्तरं दिली आहेत. त्यांनी म्हटलं की, पायाभूत सुविधांमध्ये सरकारनं केलेल्या गुंतवणुकीमुळं मोठ्या प्रमाणावर विकास आणि रोजगार निर्माण होणार आहेत. त्यामुळं आम्ही सातत्यानं भांडवली गुंतवणुकीचा परिप्रेक्ष वाढवला आहे.

धोरणांमधील सुधारणांचा चांगला परिणाम

तसेच धोरणांच्या सुधारणांद्वारे लोकांचं जीवनमान सुधारण्याच्या दृष्टीनं लक्ष केंद्रीत करण्यात आला आहे. या सुधारणांमुळं भारताच्या विकासाच्या प्रवासानं आता वेग धारण केला आहे. यामुळं भारताच्या ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्टाकडं जाण्याचा आत्मविश्वास वाढला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zilla Parishad Election : आदेश आला ! जिल्हा परिषद-पंचायत समितीचा धुरळा उडणार, आचारसंहिता दोन दिवसात शक्य, निवडणूक आयोगाकडून जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Latest Marathi News Live Update : 2014ला अदानी महाराष्ट्रात एका ठिकाणी होते, आता...; राज ठाकरेंनी नकाशाच दाखवला

Bigg Boss Marathi 6 Live Update: रितेश देशमुखच्या सहकलाकार अभिनेत्रीची 'बिग बॉस मराठी ६' च्या घरात एंट्री

Pune Crime : शेअर बाजाराच्या नावाने अडीच कोटींचा डल्ला! ट्रेडज इन्व्हेस्टमेंटच्या संचालकांना हैदराबाद विमानतळावर बेड्या

अभिनयाचा पडदा ते राजकारणाचं मैदान गाजवणारी दीपाली सय्यदची बिग बॉसमध्ये एंट्री !

SCROLL FOR NEXT