Prime Minister Narendra Modi hosting a special dinner for NDA MPs at his official residence to discuss organizational strategies and strengthen alliance coordination.

 

esakal

देश

Modi hosts Dinner for NDA MPs : मोदींकडून 'NDA' खासदारांसाठी पंतप्रधान निवासस्थानी विशेष भोजनाचे आयोजन

PM Modi hosts a special dinner meet for NDA MP : काश्मिरच्या कहव्यापासून ते बंगलाच्या रसगुल्ला पर्यंत प्रत्येक राज्यातील खास पदार्थाचा होता समावेश

Mayur Ratnaparkhe

PM Modi Hosts Special Dinner for NDA MPs at Official Residence :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी पंतप्रधानांच्या निवासस्थानी एनडीए खासदारांसाठी रात्रीच्या जेवणाचे आयोजन केले होते. सुमारे ४२७ एनडीए खासदार पंतप्रधानांच्या निवासस्थानी आले आणि त्यांनी पंतप्रधान मोदींसोबत जेवणाचा आनंद घेतला.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक खासदाराच्या टेबलजवळ गेले, त्यांची विचारपूस केली आणि आग्रहाने जेवू देखील घातले. सर्व एनडीए घटक पक्षांचे लोकसभा आणि राज्यसभा खासदार रात्रीच्या जेवणासाठी आले होते, प्रत्येक टेबलावर सहा ते आठ खासदार उपस्थित होते.

तर एनडीए खासदारांच्या भोजन समारंभात प्रत्येक राज्यातील पदार्थांचा समावेश होता. काश्मिरी कहवा आणि बंगालच्या रसगुल्लापासून ते पंजाबच्या मिस्सी रोटीपर्यंत, खासदारांना प्रत्येक प्रदेशातील काही प्रकारचे पदार्थ वाढण्यात आले.

वेगवेगळ्या राज्यांतील खासदारांना एकमेकांना जाणून घेण्यासाठी आणि संवादाद्वारे एकमेकांबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी वेगवेगळ्या टेबलांवर बसवण्यात आले होते. पाच ते सात खासदार आणि एक मंत्री एका टेबलावर बसले होते. अशा सुमारे ५५ टेबलांची व्यवस्था करण्यात आली होती. पंतप्रधान मोदींसोबत त्यांच्या टेबलवर देवेगौडा, श्रीकांत शिंदे, सांभवी, रविशंकर प्रसाद आणि जगदंबिका पाल हे खासदार होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AI and Jobs : ‘एआय’ नोकऱ्या संपवणार? जाणून घ्या, ‘RBI’चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी काय दिलंय उत्तर

Year Ender 2025: हत्तींचं स्थलांतर, बिबट्यांची दहशत अन् कुत्र्यांचा वाद… 'हे' वर्ष वन्यजीवांसाठी इतकं हादरवणारं का ठरलं?

Kolhapur CPR : दोन हजारांत एमआरआय, ३५० रुपयांत सीटीस्कॅन; सीपीआरमधील सुविधेमुळे रुग्णांचा खर्च आणि वेळ वाचला

Year Ender 2025: लोकांनी वजन कमी करण्यापेक्षा हेल्दी राहण्यावर दिला भर; 'हे' ठरले 2025 चे 7 जबरदस्त फिटनेस ट्रेंड्स

Latest Marathi News Live Update: अॅडव्होकेट प्रशांत पाटील यांनी बारामती सत्र न्यायालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वतीने लावली हजेरी

SCROLL FOR NEXT