Prime Minister Narendra Modi with Chinese President Xi Jinping as global leaders prepare for crucial talks; Trump may raise tariff concerns.  esakal
देश

Modi and Xi Jinping meeting : अखेर मोदी अन् जिनपिंग यांच्या भेटीचा मुहूर्त ठरला! , ट्रम्प ‘टॅरिफ’वरही होणार चर्चा?

India China talks: गेल्या सात वर्षांत पंतप्रधान मोदींचा हा पहिला चीन दौरा असेल

Mayur Ratnaparkhe

Modi Xi Jinping meeting confirmed: जपानचा दोन दिवसांचा दौरा संपल्यानंतर, पंतप्रधान मोदी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या निमंत्रणावरून एससीओ शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी चीनमध्ये असणार आहे. तर या द्विपक्षीय चर्चेत ट्रम्प टॅरिफवरही चर्चा होण्याची शक्यता आहे.

ट्रम्प यांच्यासोबत सुरू झालेल्या टॅरिफ वॉर दरम्यान आता पंतप्रधान मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भेटीचा मुहूर्त अखेर ठरला आहे.  तियानजिन येथे रविवारी होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेपासून बाजूला दोन्ही नेते द्विपक्षीय बैठक घेतील. ३१ ऑगस्ट रोजी एससीओ शिखर परिषदेच्या वेळी दोन्ही नेते भेटतील. अशी माहिती समोर आली आहे.

तर २१ ऑगस्ट रोजी, भारतातील चीनचे राजदूत झू फेहोंग म्हणाले की, एससीओ शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदींचा तियानजिन दौरा दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये सुधारणा आणि विकासाला एक नवीन चालना देईल. ही भेट यशस्वी करणे खूप महत्वाचे आहे, आमच्याकडून आम्ही या भेटीला खूप महत्त्व देतो.

गेल्या सात वर्षांत पंतप्रधान मोदींचा हा पहिला चीन दौरा असेल आणि जून २०२० मध्ये वास्तविक नियंत्रण रेषेवर दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झालेल्या गलवान खोऱ्यातील संघर्षानंतरचा हा पहिलाच दौरा असणार आहे.

तर २०२४ मध्ये रशियातील काझान येथे झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या वेळी दोन्ही नेत्यांची बैठक झाली. भारत आणि चीनमधील चार वर्षांपासून सुरू असलेला सीमा संघर्ष संपविण्यासाठी सुमारे ३५०० किमी लांबीच्या एलएसीवर गस्त घालण्याचा करार झाल्यानंतर द्विपक्षीय चर्चेत यश आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Smriti Mandhana: साखरपुड्याची अंगठी गायब अन्...; पलाश मुच्छलसोबत लग्न पुढे ढकलल्यानंतर स्मृती मानधनाची पहिली पोस्ट, म्हणाली...

Sangli Healthcare Services : जिल्हा नियोजन निधीची मोठी मदत; सांगली-मिरजमध्ये सरकारी आरोग्यसेवेचे ‘मॉडर्न रूप’ MRI, CT, OT सर्व सुविधा एकाच छताखाली!

Marathi Breaking News LIVE: - इंडिगोचे विमान अहमदाबाद विमानतळावर उभे

Sangli District Bank : कर्जमाफीच्या घोषणेनंतर जिल्ह्यात पीक कर्ज वसुली ठप्प; अडीच हजार कोटींच्या थकबाकीत अडकलेली जिल्हा बँक आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर

अक्षय-सलमानसोबत केलं काम पण आईसाठी करिअरला मारली लाथ; रियल लाइफ श्रावण बाळ झालेल्या या अभिनेत्याला ओळखलंत?

SCROLL FOR NEXT