How do MMS viral? Dont do these things
How do MMS viral? Dont do these things  esakal
देश

Mohali MMS News: मोहाली MMS कांड प्रकरणी सैन्यातील जवानाला अटक!

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : पंजाबच्या मोहालीतील चंदीगड विद्यापीठात घडलेल्या MMS लीक प्रकरणी एक मोठा खुलासा झाला आहे. आरोपी मुलींकडं चौकशी केल्यानंतर हे समोर आलंय की, तिला सैन्यातील एक जवान व्हिडिओसाठी ब्लॅकमेल करत होता. हा जवान सध्या अरुणाचल प्रदशातील एटानगर इथं तैनात असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. (Mohali MMS latest News Army jawan arrested in Mohali MMS scandal)

पंजाब पोलिसांनी या जवानाची चौकशी सुरु केली आहे. संजीव कुमार असं या जवानाचं नाव असून तो जम्मूचा रहिवासी आहे. दरम्यान, एसआयटीच्या चौकशीला उशीर होत आहे. कारण अद्याप या व्हिडिओचा फॉरेन्सिक अहवाल टीमकडे पोहोचलेला नाही. आरोपी मुलीकडे पोलिसांनी सुमारे ३ तास चौकशी केली, यामध्ये तिला १५० प्रश्न पोलिसांनी विचारले. यामध्ये मुलींचे व्हिडिओ बनवण्यामागील कारण काय होतं? आरोपी विद्यार्थीनीचे दोन्ही मित्र पंकज आणि सनी मेहता या व्हिडिओचं काय करत होते? असे अनेक सवाल यावेळी विचारले गेले. या चौकशीचं व्हिडिओ चित्रिकरणही करण्यात आलं कारण गरज पडल्यास ते कोर्टात सादर करता येईल.

अद्याप फॉरेन्सिकचा सविस्तर अहवाल बाकी

मोहालीतील चंदीगड विद्यापीठातील विद्यार्थीनींचे अश्लील व्हिडिओ बनवून ते व्हायरल केल्याप्रकरणी पंजाब पोलिसांची चौकशी अत्यंत धीम्या पद्धतीनं सुरु आहे. कारण अद्याप या व्हायरल व्हिडिओजचा सविस्तर फॉरेन्सिक अहवाल पोलिसांना मिळालेला नाही. या प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन विशेष अधिकाऱ्यांचं विशेष तपास पथकंही स्थापन करण्यात आलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

मोठी बातमी! बारावीचा 25 मे तर दहावीचा निकाल 5 जूनपूर्वी; विद्यार्थ्यांची जुलैमध्ये पुरवणी परीक्षा; बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात असा होईल बदल

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

SCROLL FOR NEXT