देश

Mohammed Rafi Birth Anniversary :जेव्हा मोहम्मद रफीजींचे गाणे ऐकून भारताचे पहिले पंतप्रधानही अश्रु रोखू शकले नाहीत!

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूडच्या इतिहासामध्ये अनेक पार्श्वगायक आले आणि गेले मात्र, मोहम्मदरफी साहेबांसारखा गायक क्वचितच घडला असेल. असेच म्हणावे लागेल. आज मोहम्मद रफी साहेबांचा स्मृतीदिन. त्याच पार्श्वभूमीवर पाहुयात त्यांचा जीवनप्रवास.

मुहम्मद रफी यांचा जन्म 24 डिसेंबर 1924 रोजी पंजाबमध्ये झाला. रफी यांनी लहानपणापासूनच संगीतात रस दाखवायला सुरुवात केली. त्यांचे कुटुंब लहानपणीच गावातून लाहोरला आले होते. रफी यांचे मोठे भाऊ त्यांच्यासाठी प्रेरणास्थान होते.

हाजी अली मोहम्मद हे त्यांच्या वडिलांचे नाव होते. त्यांचे कुटुंब मूळचे कोटला सुलतान सिंग या खेड्यातील होते. हे गाव सध्याच्या पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यातील मजीठा जवळ आहे. रफीजींचे टोपणनाव फिको होते.  त्यांच्या जन्मगावी एकदा एक फकीर गाणी म्हणत आला. त्यावेळी त्याच्या सुरात सूर मिसळून रफी साहेब गाऊ लागले. तेव्हा त्या फकीराने त्यांना मोठा गायक होशील असा आशिर्वादही दिला.

1935 मध्ये रफी लाहोर पाकिस्तान येथे गेले. तेथे भट्टीगेट गल्ली जवळ त्यांच्या मोठ्या भावांनी एक व्यवसाय सुरू केला. त्यांच्या मित्राने रफी साहेबांची प्रतिभा पाहिली आणि त्यांना गायनासाठी प्रोत्साहन दिले. 1944 मध्ये मोहम्मद रफी मुंबई येथे आले. मुंबईत गायनातील बारीक गोष्टींचे ज्ञान मिळावे यासाठी त्यांनी उस्ताद अब्दुल वाहिद खान आणि पंडित जीवनलाल मट्टू तसेच फिरोज निजामी यांच्याकडून शास्त्रीय गायनाचे शिक्षण घेतले.

वयाच्या तेराव्या वर्षी मोहम्मद रफी लाहोर येथे एका संस्थेमध्ये गायन केले होते. भारतीय ऑल इंडिया रेडिओ स्टेशन लाहोरने त्यांना गायनासाठी आमंत्रित केले होते. 1945 साली चित्रपट “गाव की गोरी” मधून त्यांनी प्लेबॅक सिंगर म्हणून हिंदी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला. नोशाद यांच्यासोबत “हिंदुस्तान के हम है” मधील काम फारच प्रशंसेच्या पात्र ठरले. त्यानंतर चित्रपट “लैला-मजनू” तील “तेरा जलवा जिसने देखा” मध्ये त्यांनी प्रथम चित्रपटातही काम केले.

1949 पासून त्यांच्या चित्रपटसृष्टीचा सफर खऱ्या अर्थाने सुरू झाला “चांदनी रात”, “दिल्लगी”, “दुलारी” चित्रपटांमध्ये गीत गायले. मोहम्मद रफी यांनी दोन विवाह केले. त्यांचा पहिला विवाह बेगम बशीरसोबत झाला होता. भारताच्या फाळणीनंतर त्यांच्या पत्नीने भारतात राहण्यास नकार दिला परंतु ते भारतात राहिले. त्यांना या पत्नीपासून एक मुलगा सईद होता. त्यानंतर त्यांनी दुसरा विवाह केला. त्यांची एकूण चार मुले व तीन मुली आहेत.

तुम्ही सर्वांनीच आजवर मोहम्मद रफी साहेबांच्या आयुष्याशी निगडीत अनेक प्रकारचे किस्से ऐकलेले असतील. मात्र, आज आम्ही तुम्हाला असा एक किस्सा सांगणार आहोत, जो किस्सा फारच कमी लोकांनी ऐकला असेल. हा किस्सा त्या काळातला आहे जेव्हा मोहम्मद रफी यांनी एका इव्हेंटमध्ये 'दोस्ती' चित्रपटातील 'चाहूंगा मैं तुझे सांझ सवेरे...' हे गाणं गायलं होतं.

त्या कार्यक्रमामध्ये भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु देखील प्रेक्षक म्हणून उपस्थित होते. असं म्हटलं जातं की, पंडित नेहरु त्या गाण्याला लाईव्ह ऐकून आपल्या भावना थांबवू शकले नाहीत. त्यांना अश्रु रोखता आले नाहीत.

रफी साहेबांचा आणखी एक किस्सा आहे. जो महाराष्ट्राची ओळख असलेल्या भाकरीचा आणि ठेचा याच्याशी संबंधित आहे. रफीजींना खाण्याची प्रचंड आवड होती. एकदा त्यांची मानसकन्या उषा तिमोथी, रफी, संगीतकार सी. रामचंद्र आणि दिलीपकुमार हे मालेगांवच्या एका चॅरिटी शोसाठी निघाले होते. नाशिकजवळ वाटेत त्यांना काही महिला फडक्यातून शिदोरी घेऊन जात असताना दिसल्या. तेंव्हा सी. रामचंद्र यांनी या बायका फडक्यातून ज्वारीच्या भाकर्‍या व लाल मिरचीचा ठेचा घेऊन जातात, असे सांगितले.

त्यावेळी गाडी थांबवून त्या महिलांकडची भाकरी आणि ठेच्यावर ताव मारला. खाऊन झाल्यावर रफीजींनी शंभराच्या काही नोटा त्या बायकांना देऊ केल्या. पण, त्यांनी त्या घेतल्या नाहीत.

अशा या अद्भूत अद्वितीय गायकाचा 31 जुलै 1980 मध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा त्याकाळातील सर्वात मोठी अंत्ययात्रा होती. १० हजारच्या वर संख्येने लोक त्यांना निरोप द्यायला जमले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Crime News: सलमान खान गोळीबार प्रकरणी दोघांना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Sankarshan Karhale: "उद्धव ठाकरेंचा फोन आला अन् राज ठाकरेंनी घरी बोलवलं"; राजकारणावरील कविता सादर केल्यानंतर काय-काय झालं? संकर्षणनं सांगितलं

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार

SCROLL FOR NEXT