Mohammed Zubair Latest News
Mohammed Zubair Latest News Mohammed Zubair Latest News
देश

मोहम्मद जुबेरला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; पोलिस कोठडीस नकार

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : आक्षेपार्ह ट्विटप्रकरणी उत्तर प्रदेशच्या लखीमपूर न्यायालयाने ऑल्ट न्यूजचे सह-संस्थापक मोहम्मद जुबेरला (Mohammed Zubair) १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीत (judicial custody) पाठवण्याचा निर्णय दिला आहे. जुबेरला २५ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत (judicial custody) राहावे लागणार आहे. त्याची पोलिस कोठडी देण्यास न्यायालयाने नकार दिला. जुबेरच्या जामीन अर्जावर न्यायालय १३ जुलै रोजी सुनावणी करणार आहे. (Mohammed Zubair Latest News)

सप्टेंबर २०२१ मध्ये आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी जुबेरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जुबेरला (Mohammed Zubair) आता सीतापूर कारागृहात राहावे लागणार आहे. आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी दिल्लीच्या न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर झुबेरला उत्तर प्रदेशमधील सीतापूर येथे नेण्यात आले. जिथे तीन व्यक्तींविरुद्ध ट्विटद्वारे धार्मिक भावना भडकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्विटमध्ये महंत बजरंग मुनी, नरसिंहानंद सरस्वती आणि आनंद स्वरूप यांना लक्ष्य करण्यात आले होते. तिघांनाही द्वेष पसरवणारे असल्याचे सांगण्यात आले आहे. खैराबाद क्षेत्र हिंदू शेर सेनेचे जिल्हाध्यक्ष भगवान शरण यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही तक्रार ऑल्ट न्यूजचे सह-संस्थापकांविरुद्ध १ जून रोजी दाखल करण्यात आली होती.

२७ जून रोजी पहिल्यांदा अटक

२७ जून रोजी मोहम्मद झुबेरला (Mohammed Zubair) पहिल्यांदा अटक करण्यात आली होती. जेव्हा ट्विटर पोस्टच्या आधारे एफआयआर नोंदवण्यात आला होता. तेव्हा हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप मोहम्मद झुबेरवर करण्यात आला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT