Mohan Bhagwat Sakal media
देश

आपल्या अटींनुसार व्यापार करणे हा स्वदेशीचा खरा अर्थ - मोहन भागवत

कृष्ण जोशी

मुंबई : आपण कितीही स्वदेशीचा आणि चिनी वस्तूंवरील (chini objects) बहिष्काराचा नारा दिला तरीही आपल्या मोबाईलमधील (mobile) महत्वाचे लहानसहान (small parts) भाग कोठून येतात हे ध्यानात ठेवावे. स्वदेशी (indian) म्हणजे अन्य सर्व गोष्टी विसरा असे नाही. आपल्या गरजांनुसार, आपल्या अटींनुसार व्यापार करणे (business trading) हा स्वदेशीचा खरा अर्थ आहे, असे सरसंघचालक मोहन भागवत (mohan bhagwat) यांनी आज येथे सांगितले.

दादरच्या राजा शिवाजी विद्यालयात ध्वजारोहण समारंभात ते बोलत होते. चीनवरील अवलंबित्व वाढल्यास भविष्यात आपल्याला त्याच्यासमोर झुकावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. आपण वापरतो ते इंटरनेट तंत्रज्ञान देखील मूळचे आपले नाही, ते बाहेरून येते. स्वदेशीचा नारा देताना आपले अन्य देशांवरील अवलंबित्व विसरता येणार नाही. परकीय तंत्रज्ञान आपण आपल्या अटींवर स्वीकारणे महत्वाचे आहे. स्वदेशी म्हणजे इतर सर्व बाबी विसरा असे नाही, आपला परदेशांशी व्यापार आपल्या अटींनुसार झाला पाहिजे. त्यासाठी आपण स्वनिर्भर होणे महत्वाचे आहे, हीच खरी स्वदेशी, अशी व्याख्यादेखील भागवत यांनी सांगितली.

जे उत्पादन आपण देशात करू शकतो ते परदेशातून मागवता कामा नये. जास्तीत जास्त उत्पादन करून मग गुणवत्तेसाठी स्पर्धा करण्याची आर्थिक दूरदृष्टी हवी. आपण आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या विरोधात नाही, पण आपल्या गावागावात उत्पादन व्हायला हवे. जास्तीत जास्त लोकांना पुरून उरेल एवढे उत्पादन करण्यापेक्षा जास्तीत जास्त लोकांनी उत्पादन केले तर आपल्याला हवे ते मिळेल. त्यासाठी विकेंद्रित पद्धतीने औद्योगीकरण झाल्यास मोठ्या संख्येने रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध होतील, यावरही भागवत यांनी भर दिला.

उद्योगांना सरकारकडून प्रोत्साहन मिळायला हवे. उद्योग चालवणे हे सरकारचे काम नाही, त्यांनी फक्त नियमनाचे काम करावे. शंभर टक्के राष्ट्रीयीकरणही नकोच पण उद्योगधंद्यांशी फटकूनही वागता येणार नाही. मोठ्या उद्योगांशी स्पर्धा करण्यास छोट्या उद्योगांना सक्षम करायला हवे. नफाकेंद्रीत वृत्तीपेक्षा जनकेंद्रीत भावनेने काम व्हायला हवे. संशोधनावर भर दिल्यासच आपला विकास होईल. विकासावर भर देताना नैसर्गिक साधनसंपत्तीची हानी होणार नाही याकडेही लक्ष दिले पाहिजे, त्यासाठी गरजांवरही नियंत्रण ठेवले पाहिजे. आपण किती कमावतो यापेक्षा आपण निसर्गाचे देणे किती फेडतो यावर आपले राहणीमान ठरले पाहिजे, असेही भागवत यांनी दाखवून दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: मुलं म्हणतील, आई-वडिलांनी पैसे घेऊन मत विकले... राज ठाकरेंनी सांगितलं लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांचं गणित?

ZP Election Date News : जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा कधी? इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता

Ajit Pawar Pune Manifesto: पुण्यात मोफत मेट्रो अन् मोफत बस देणार, अजित पवारांचं पुणेकरांना आश्वासन! दोन्ही राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध

Gold Rate Today : खरेदीदारांना धक्का! अमेरिकेच्या ‘मी’पणामुळे सोनं-चांदी उसळली; आज खरेदी करायची असेल तर आधी हे दर पाहाच!

WPL 2026 मध्ये आज Gujarat Giants चा UP Warriors विरुद्ध सामना, मागील कामगिरी सुधारण्याकडे दोन्ही संघाचं लक्ष्य; आज कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT