Mohan Charan Majhi to be the new CM of Odisha Esakal
देश

CM of Odisha: सरपंच ते मुख्यमंत्री! जाणून घ्या कोण आहेत ओडिशाचे नवे मुख्यमंत्री

Mohan Charan Majhi: यानंतर त्यांनी हळूहळू राजकारणात प्रवेश केला आणि भारतीय जनता पक्षाचे काम सुरू केला. हळुहळू त्यांची ओडिशातील भाजपचे दिग्गज आदिवासी नेते म्हणून गणना होऊ लागली.

आशुतोष मसगौंडे

ओडिशात पहिल्यांदाच सत्तेत आलेल्या भाजपने मोहन चरण माझी यांची राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून घोषणा करण्यात आली आहे. मंगळवारी झालेल्या भाजप विधीमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर माझी यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली.

भाजप हायकमांडने दोन केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि भूपेंद्र यादव यांची ओडिशासाठी निरीक्षक म्हणून नियुक्ती केली होती.

कोण आहेत मोहन चरण माझी?

मोहन चरण माझी यांचा जन्म 1972 मध्ये ओडिशातील केओंझार जिल्ह्यातील रायकलान येथे झाला. प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांचा राजकीय प्रवास सरपंच म्हणून सुरू झाला.

यानंतर त्यांनी हळूहळू राजकारणात प्रवेश केला आणि भारतीय जनता पक्षाचे काम सुरू केला. हळुहळू त्यांची ओडिशातील भाजपचे दिग्गज आदिवासी नेते म्हणून गणना होऊ लागली.

सरपंच ते मुख्यमंत्री

मोहन चरण माझी 2000 साली पहिल्यांदा आमदार झाले. ते ORV कायद्यांतर्गत एससी आणि एसटीच्या स्थायी समितीचे सदस्यही होते.

यापूर्वी त्यांनी 1997 ते 2000 पर्यंत सरपंच म्हणून काम पाहिले होते. मोहन माझी हे त्यांच्या जनसेवा आणि संघटनात्मक कौशल्यासाठी ओळखले जातात. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनीही माझी यांचे एक तरुण आणि कार्यक्षम कार्यकर्ता म्हणून वर्णन केले आहे.

राजकीय प्रवास

2000 मध्ये माझी केओंझार विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून विजयी झाले.

2009 मध्ये भाजपने पुन्हा एकदा मोहन चरण माझा यांच्यावर विश्वास दाखवत उमेदवारी दिली आणि दुसऱ्यांदा जिंकले. पुढे 2019 मध्येही मांझी याच मतदारसंघातून विजयी झाले.

मोहन चरण माझी 2024 मध्ये चौथ्यांदा केओंझर विधानसभेतून विजयी झाले आहेत. यावेळी निवडणुकीत मोहन चरण माझी यांना एकूण 87815 मते मिळाली आणि त्यांनी बिजू जनता दलाच्या प्रतिस्पर्धी मीना माझी यांचा 11577 मतांच्या मोठ्या फरकाने पराभव केला.

निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, माझी आणि त्यांच्या कुटुंबाची एकूण चल-अचल संपत्ती 1.97 कोटी रुपये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे टोमणे मारणे आणि टीका करण्यापलिकडे काही करू शकत नाहीत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांचा टोला

Indian Stock Market Opening : शेअर बाजारात हिरव्या रंगात उघडला; सेन्सेक्स 330 अंकांनी वाढला; जाणून घ्या कोणते शेअर्स तेजीत?

Latest Marathi Live Update News: नाशिकमध्ये भाजपची निवडणूक जबाबदारी राहुल ढिकलेंवर

Wardha Accident: कंटेनर-कार अपघातात तीन मित्र ठार; अल्लीपूर -धोत्रा मार्गावरील एकुर्ली फाट्याजवळची घटना

India vs Australia 4th T20: आता शुभमन गिलच्या फॉर्मची प्रतीक्षा; भारत-ऑस्ट्रेलिया आज चौथा टी-२० सामना, आघाडीसाठी प्रयत्न

SCROLL FOR NEXT