देश

Mohan Yadav: मोदींचं धक्कातंत्र! शिवराजसिंह यांच्याऐवजी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी दिला नवा चेहरा; कोण आहेत मोहन यादव?

मध्य प्रदेशमध्ये भाजपनं पुन्हा धक्कातंत्र वापरलं असून अशा व्यक्तीच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घातली आहे ज्यांच नाव या शर्यतीत कधीही नव्हतं.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मध्य प्रदेशमध्ये भाजपनं पुन्हा धक्कातंत्र वापरलं असून अशा व्यक्तीच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घातली आहे ज्यांच नाव या शर्यतीत कधीही नव्हतं. ते नावं म्हणजे मोहन यादव. डॉ. मोहन यादव हे उजैन दक्षिण मतदारसंघातील आमदार आहेत. (Mohan Yadav is the new Chief Minister of Madhya Pradesh BJP announced)

शिवराज सिंह यांनीच दिलं नाव

मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री कोण होणार यासाठी भाजपच्या संसदीय पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीत डॉ. मोहन यादव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. मोहन यादव हे उजैन दक्षिण मतदारसंघातील आमदार आहेत. (Marathi Tajya Batmya)

मोहन यादव हे संघाचे खास कार्यकर्ते मानले जातात. माध्यमांतील वृत्तानुसार शिवराज सिंह चौहान यांनीच मोहन यादव यांच्या नावाचा प्रस्ताव संसदीय दलाच्या बैठकीत ठेवलं होतं. त्यामुळं आता सर्व चर्चांवर पूर्णविराम बसला आहे. (Latest Marathi News)

नरेंद्रसिंह तोमर होणार विधानसभा अध्यक्ष

मध्य प्रदेशात मोहन यादव हे मुख्यमंत्री बनले आहेत तर राजेंद्र शुक्ला आणि जगबीर देवडा हे दोघे उपमुख्यमंत्री असणार आहेत. तर नरेंद्र सिंह तोमर हे विधानसभा अध्यक्ष होणार आहेत. यामुळं आता शिवराज पर्व संपुष्टात येऊन मध्य प्रदेशच्या राजकारणात नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री बनलेले मोहन यादव हे शिवराज सिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळात शिक्षण मंत्री होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ उपसमितीचं पुनर्गठन; राधाकृष्ण विखेंकडे अध्यक्षपद

Mumbai Local Megablock: रविवारी रेल्वे प्रवाशांना फटका बसणार, मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर ब्लॉक; वेळापत्रकात बदल

Beed Lawyer News: सरकारी वकिलाने जीव दिल्याच्या प्रकरणात न्यायाधीशावर गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

'वीण दोघांतली...'साठी विचारणा झाल्यावर तेजश्रीने २४ तास काहीच उत्तर दिलं नाही; कारण सांगत म्हणाली- त्या एका दिवसात...

Karad News : पृथ्वीराज चव्हाण यांच्या घरातील मतांची एकदा नव्हे, दोनदा नव्हेत तर तीन वेगवेगळ्या ठिकाणी नोंदणी; भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला आरोप

SCROLL FOR NEXT