Delhi Monkeypox Latest News Delhi Monkeypox Latest News
देश

Monkeypox : केरळपाठोपाठ दिल्लीला धोका; तिसरा रुग्ण आढळला, देशात ८ रुग्ण

आतापर्यंत केरळमध्ये एकूण पाच रुग्ण आढळले आहेत, तर दिल्लीत तीन रुग्ण

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : दिल्लीत राहणाऱ्या आणखी एका नायजेरियन व्यक्तीला मंकीपॉक्सची (Monkeypox) लागण झाल्याचे समोर आले आहे. दिल्लीत (Delhi) मंकीपॉक्सची लागण झालेली ही तिसरी व्यक्ती आहे, अशी अधिकृत माहिती सूत्राने दिली आहे. यासोबतच देशात मंकीपॉक्सची लागण झालेल्यांची संख्या आता आठ झाली आहे. आजच केरळमध्ये (Kerala) एका ३० वर्षीय व्यक्तीला मंकीपॉक्सची लागण झाली आहे. आतापर्यंत केरळमध्ये एकूण पाच रुग्ण आढळले आहेत. (Delhi Monkeypox Latest News)

मंगळवारी ३१ वर्षीय नायजेरियन व्यक्तीला संसर्ग झाल्यानंतर लोक नायक रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे त्याची चाचणी पॉझिटिव्ह आली. रुग्णाचा परदेश प्रवासाचा इतिहास नाही. सध्या भारतात मंकीपॉक्सची आठ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी पाच रुग्णांचा परदेश प्रवासाचा इतिहास आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी मंगळवारी राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

भारतातील आठ मंकीपॉक्स (Monkeypox) प्रकरणांपैकी पाच केरळमधील (Kerala) आणि तीन दिल्लीतील (Delhi) आहेत. यापैकी केरळमधील त्रिशूर जिल्ह्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे, असेही मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. लोकनायक जयप्रकाश (एलएनजेपी) रुग्णालयात दाखल दिल्लीतील मांकीपॉक्सच्या पहिल्या रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. पश्चिम दिल्लीतील ३४ वर्षीय व्यक्ती गेल्या महिन्यात मंकीपॉक्स संक्रमित आढळला होता.

या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या डॉक्टरांसह १४ जणांना वेगळे ठेवण्यात आले होते. यापैकी कोणालाही कोणतीही लक्षणे दिसून आली नाही. रुग्णाला सोमवारी रात्री रुग्णालयातून डिस्चार्ज दिला.

शहरातील मंकीपॉक्सचा दुसरा रुग्ण आणि नायजेरियन नागरिकाची प्रकृती स्थिर आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. रुग्णाला ताप आहे. त्वचेवर फोड आले आहेत. उपचारासाठी एलएनजेपी रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवले आहे. अन्य दोन संशयित रुग्णांचे अहवाल येणे बाकी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court : “निःपक्षपातीपणे अन् न्याय्य पद्धतीने काम करा, न्यायालयाचा भार वाढवू नका”; निवडणूक आयोगाला हायकोर्टाने फटकारलं

Pune Ganpati Visarjan Live Tracking: गणपती विसर्जन मिरवणूक Live; कोणतं मंडळ कुठे पोहोचलं? एका क्लिकवर पाहा लाईव्ह लोकेशन अन् ट्रॅफिक अपडेट्स

Raj Thackeray On Gyanesh Kumar : ‘ज्ञानेशाकडून सत्तेतले रेडे आपले वेद वदवतायत’; राज ठाकरेंचा ज्ञानेश कुमारांवर पुन्हा निशाणा

Maharashtra Drought Subcommittee : बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना नऊ मंत्र्यांसह मुख्य सचिवांचा समावेश

Maharashtra Ganesh Visarjan Live: पारंपरिक पद्धतीने तांबडी जोगेश्वरी गणपतीची भव्य मिरवणूक, विसर्जनासाठी भाविकांची मोठी गर्दी

SCROLL FOR NEXT