Weather Update Esakal
देश

Weather Update: शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! मॉन्सूनने व्यापला अंदमान-निकोबार बेटसमूह

मॉन्सून यंदा चार जूनपर्यंत केरळात दाखल होण्याचा अंदाज

सकाळ डिजिटल टीम

संपूर्ण अंदमान निकोबार बेटांसह बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) मंगळवारी मजल मारली. यंदा सर्वसाधारण वेळेच्या दोन दिवस अगोदरच (ता. १९ मे) दक्षिण बंगालचा उपसागर, निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्रात मॉन्सून दाखल झाला.

त्यानंतर मॉन्सूनची वाटचाल थांबली होती. संपूर्ण अंदमान, निकोबार बेटसमूह आणि अंदमान समुद्रासह पूर्व-मध्य बंगालच्या उपसागराच्या काही भागांत मंगळवारी मॉन्सून दाखल झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

अरबी समुद्रातील आगमनास पोषक हवामान होत असून, दोन दिवसांत मालदीव आणि कोमोरीन भागांत मॉन्सून दाखल होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. तसेच अरबी समुद्रातही मॉन्सूनच्या आगमनाचे संकेत आहेत. मॉन्सून यंदा चार जूनपर्यंत केरळात दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने यापूर्वीच वर्तविला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Action On Banks: आरबीआयने मुंबईतील ५२ वर्षे जुन्या बँकेचा परवाना केला रद्द ; तुमचंही खातं आहे? ग्राहकांच्या पैशांचं काय होणार?

GT vs SRH Live : साई सुदर्शनने इतिहास रचला! गुजरातचा डोलारा सांभाळला; हैदराबादविरुद्ध विक्रमी खेळी अन् आव्हानात्मक लक्ष्य

Latest Marathi News Live Update : नीट प्रकरणातील संशयित शुभम खैरनारची सीबीआयकडून चौकशी सुरू, दिल्लीला नेण्याची शक्यता

Gold Crisis Explainer: १.४ अब्ज भारतीयांना १ वर्ष सोने खरेदी टाळण्याचे आवाहन भारताची अर्थव्यवस्था बदलू शकते का?

Karnataka Government Employees : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात 1.50 टक्क्यांची वाढ; 'या' तारखेपासून लागू होणार नवे वेतन

SCROLL FOR NEXT