Smriti Irani vs Rahul Gandhi esakal
देश

स्मृती इराणी यांनी घेतली राहुल गांधींची हजेरी, संसदेतील अनुपस्थितीवरून झापलं

सोमवारपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू झालंय.

सकाळ डिजिटल टीम

सोमवारपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू झालंय.

नवी दिल्ली : सोमवारपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) सुरू झालंय. अधिवेशन सुरू होऊन दोन दिवस झाले असून विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षांनी अग्निपथ योजना, महागाई आणि असंसदीय शब्दांची यादी यावरुन सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलाय. दरम्यान, स्मृती इराणी यांनी संसदेतील अनुपस्थितीवरून राहुल गांधींना चांगलंच झापलंय.

अधिवेशन सुरू होण्यापूर्वी सरकारनं बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीव्यतिरिक्त, अधिवेशनाची रणनीती ठरवण्यासाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानी बैठक झाली. त्याचवेळी संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं की, संसदेच्या या अधिवेशनात विविध विभागांकडून 32 विधेयकं मांडण्याचे संकेत दिले आहेत, त्यापैकी 14 विधेयकं तयार आहेत. मात्र, आम्ही चर्चेशिवाय विधेयक मंजूर करणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलंय.

मंगळवारी विरोधी पक्षांच्या गदारोळामुळं लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज बुधवारी सकाळपर्यंत तहकूब करण्यात आलं होतं. आज पुन्हा अधिवेशन सुरु झालंय. सभागृहाच्या दुसऱ्या दिवसाचं कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधी पक्षांनी संसदेबाहेर निदर्शनं केली. या निदर्शनात काँग्रेस नेते राहुल गांधीही (Rahul Gandhi) सहभागी झाले होते. याच पार्श्वभूमीवर अधिवेशनादरम्यान, भाजपच्या महिला नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी राहुल गांधींना चांगलंच सुनावलंय. इराणी म्हणाल्या, राहुल गांधी यांनी संसदेत कधीही प्रश्न विचारला नाही. नेहमीच संसदीय कामकाजाचा त्यांनी अपमान केलाय. त्यांची संसदेत उपस्थिती 40 टक्के पेक्षा कमी आहे. या व्यक्तीला संसदेत कोणतीही चर्चा नकोय, त्यासाठी स्वत:ला वाहून घेत आहेत, असा आरोप करत इराणींनी गांधींना चांगलंच झापलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT