Parliament
Parliament 
देश

सभागृहांच्या दिवसाआड बैठकांचा पर्याय; वेंकय्या नायडू व ओम बिर्ला यांनी घेतली आढावा बैठक

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - ‘कोविड-१९’ संसर्गाच्या काळात संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनातील बैठक व्यवस्थेच्या पर्यायांबाबत राज्यसभेचे सभापती एम. वेंकय्या नायडू व लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी पुन्हा एक बैठक घेऊन विस्ताराने चर्चा केली. दोन्ही सभागृहांत सर्व खासदारांची बैठक व्यवस्था करून प्रत्येक सभागृहाच्या दिवसाआड बैठका घेण्याचा नवा पर्याय समोर आला. लोकसभेची बैठक सकाळी ९ ते १, तर राज्यसभेची बैठक दुपारी तीननंतर घेण्याचाही पर्याय पुढे आला आहे. 

साऱ्या प्रेक्षक गॅलऱ्या खासदारांसाठी वापरल्या तरी ‘दो गज की दूरी’ ठेवून राज्यसभेत मुख्य सभागृह व गॅलऱ्या मिळून एका वेळी २४५ पैकी फक्त १२७ तर लोकसभेत ५४५ पैकी केवळ २९० खासदारच बसू शकतात. त्यामुळे वेगवेगळ्या पर्यायांवर विचार सुरू आहे. 

कोरोनाच्या संसर्गामुळे संसदीय अधिवेशनांचे स्वरूप अमूलाग्र बदलणे अपरिहार्य झाले आहे. मात्र संसदेच्या दोन अधिवेशनांत सहा महिन्यांपेक्षा जास्त अंतर असू नये असाही नियम आहे. कोरोनामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ मार्चला मुदतीआधीच तहकूब केले होते. त्यामुळे सप्टेंबरपूर्वी अधिवेशन घेण्याबाबत नायडू व बिर्ला यांनी एक जूनपासून अनेकदा चर्चा केली आहे. याच मालिकेत दोन्ही पीठासीन अधिकाऱ्यांनी काल (ता. २०) आणखी एक बैठक घेऊन चर्चा केली. खासदारांनी अधिवेशनाला हजर राहिलेच पाहिजे या मताचे नायडू आहेत. 

पुढील अधिवेशनात संसद पाहायला येणाऱ्या प्रेक्षकांना परवानगी मिळणार नाही हे जवळपास निश्‍चित आहे. त्यामुळे शारीरिक अंतरभान पाळून दोन्ही सभागृहांच्या प्रेक्षक गॅलऱ्यांमध्येही खासदारांच्या बसण्याची व्यवस्था करण्याबाबत कालच्या बैठकीत चर्चा झाली. ज्या खासदार व मंत्र्यांना बोलायचे असेल त्यांचीच व्यवस्था मुख्य सभागृहांत करून इतर जास्तीत जास्त खासदारांना बैठकांना उपस्थित रहाता यावे यासाठी उपाययोजना करण्याचाही पर्याय बैठकीत समोर आला. याबाबतच्या अन्य पर्यायांवरही सविस्तर विचार करण्यास दोन्ही महासचिवांना सांगण्यात आले. 

आज शपथविधी 
राज्यसभेत नव्याने निवडून आलेल्या ६१ सदस्यांचा शपथविधी उद्या (ता. २२) होणार आहे. वेंकय्या नायडू यांनी या कार्यक्रमाच्या तयारीचाही आढावा काल घेतला. या कार्यक्रमाला पत्रकारांना परवानगी नाही. खासदारांनाही त्यांच्याबरोबर प्रत्येकी एकाच साहाय्यकाला बरोबर आणण्याची परवानगी आहे. नव्याने निवडून आलेल्या ६१ सदस्यांपैकी ४२ जणांनी उद्याच्या कार्यक्रमास येणार असल्याचे कळविले आहे. 

या मुद्यांवर चर्चा 
- ऑनलाईन अधिवेशनाचा पर्याय खुला 
- प्रेक्षक व इतर गॅलऱ्यांमध्ये खासदारांची बैठक व्यवस्था शक्‍य. 
- प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींची व्यवस्था कोठे करायची ? 
- दोन्ही सभागृहांच्या कामकाजाच्या थेट प्रक्षेपणाचे वेळापत्रक कसे आखायचे ? 
- खासदार व मंत्र्यांबरोबर येणारा लवाजमा टाळून कमीत कमी साहाय्यक बरोबर आणण्याची त्यांना सूचना करणे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT