Monsoon Sakal
देश

मॉन्सून देश व्यापणार; उत्तरेकडे वेगाने प्रवास

सकाळ वृत्तसेवा

पुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) वेगाने उत्तरेत प्रगती करत आहेत. रविवारी (ता. १३) मॉन्सून मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगालच्या अनेक भागांत दमदार हजेरी लावली. दिल्ली, हरियाना, आणि पंजाबपर्यंत सोमवारपर्यंत (ता. १५) मॉन्सून मजल मारण्याचे संकेत हवामान विभागाने दिले. त्यामुळे लवकरच मॉन्सून देश व्यापणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.(Monsoon Speed northward soon cover the country)

मॉन्सून महाराष्ट्रात ५ जूनला दाखल झाला. अवघ्या पाच दिवसांमध्ये त्याने राज्य व्यापून उत्तरेकडे प्रवास सुरू केला. त्याच वेळी त्याने ईशान्य भारतातील राज्यांमध्येही हजेरी लावली. मध्य प्रदेशचा काही भाग, संपूर्ण उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू, काश्मीर, लडाख, छत्तीसगड, ओरिसा, पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहार येथे हजेरी लावली. तसेच, उत्तर प्रदेशचा पूर्व आणि पश्चिम भाग, पंजाब येथेही मॉन्सून पोचला असल्याचे हवामान खात्याने जाहीर केले. सध्या मॉन्सूनचा प्रवास वेगाने सुरू आहे. मॉन्सूनने दीव, सुरत, नंदूरबार, भोपाळ, नाऊगाऊ, हमीरपूर, बाराबंकी, बरेली, शहारानपूर, अंबाला आणि अमृतसरपर्यंत मजल मारली आहे. मॉन्सूनला पुढे सरकण्यासाठी आणखी पोषक वातावरण आहे. त्यामुळे आणखी काही भागांत दाखल होण्याचे संकेत आहे. अनेक भागांत मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे.

येथे जोरदार पावसाची शक्यता
उत्तर महाराष्ट्र किनारपट्टी ते लक्षद्वीपर्यंत द्रोणीय क्षेत्र कायम आहे. वायव्य बंगालचा उपसागर व लगतच्या भागापासून ते पूर्व मध्य अरबी समुद्रापर्यंत पूर्व-पश्चिम दिशेला कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे कोकणात पुढील चार दिवस बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी पावसाचा जोर जास्त राहील. तसेच किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

मध्य महाराष्ट्रात सोमवारी बऱ्याच ठिकाणीओ पावसाची हजेरी लागेल. मात्र, मंगळवारी (ता. १५) काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल, असेही हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jogeshwari Fire Accident : जोगेश्वरीतील बिझनेस सेंटरला लागली भीषण आग; अनेक लोक अडकल्याची भीती

Bhaubeej Story: यम-यमुनेची कथा सांगते भाऊबीजेचं खरं महत्त्व! जाणून घ्या भाऊबीज साजरी करण्याचं कारण

Latest Marathi News Live Update : शिर्डीत बोगस मतदारांचा आकडा 15 हजारांपर्यंत जाईल - बाळासाहेब थोरात

'मी पुर्णपणे घामाघूम झालेलो...' 'आश्रम'मधला इंटिमेट सीन देताना बॉबी देओलची अशी झाली अवस्था, म्हणाला...'माझे सीन्स तेव्हा...'

Marriage Numerology : 'या' मूलांकाच्या लोकांचं लग्न टिकत नाही..पाहा तुमचा मुलांक काय?

SCROLL FOR NEXT