weather update maharashtra possibility of rain monsoon in mumbai pune konkan maharashtra  google
देश

Monsoon: यंदा किती पाऊस पडणार? IMD जाहीर केला अंदाज

यानंतरचा पावसाचा अंदाज मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : देशात यंदाचं पाऊसमान कसं असेल? याचा अंदाज हवामान खाात्यानं जाहीर केला आहे. त्यानुसार, यंदाचा मॉन्सून हा सर्वसाधारण असेल अर्थात सरासरी पाऊस हा ९६ टक्के इतका असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दिल्ली आयएमडीचे वैज्ञानिक डॉ. एम. रविचंद्रन यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. (Monsoon this year monsoon will be normal 96 percent rainfall on average says IMD)

डॉ. रविचंद्रन म्हणाले, २०२३ जून ते सप्टेंबर या काळातील मॉन्सून हा ९६ टक्के असेल यामध्ये ५ टक्के कमी-जास्त हा अंदाजही राहू शकतो. १९७१ ते २०२० या काळात संपूर्ण देशातील ऋतुनिष्ठ पावसाचा दीर्घकाळातील सरासरी पाऊसमान हे ८७ सेंमी आहे.

जेव्हा आपण ९६ टक्के पाऊस म्हणतो तेव्हा तो सर्वसाधारण पाऊस असतो. जर तुम्ही पावसाच्या विविध कॅटेगिरी पाहिल्या तर मोसमी पाऊस १०० ते ११० टक्के झाला तर तो अतिवृष्टी असतो. १०० ते १०५ टक्के पाऊस झाल्यास तो सर्वसाधारण पाऊस असतो. तसेच जर ९६ ते १०० टक्के असेल तर तो दीर्घकालीन सर्वसाधारण पाऊस असतो. पण जर ९२ ते ९५ टक्के दीर्घकाळ पाऊस असेल तर तो कमी पाऊस गणला जातो. तसेच ९० टक्क्यांहू कमी पाऊस हा खूपच कमी पाऊस असतो, असंही डॉ. रविचंद्रन यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

दरम्यान, यानंतर मे २०२३ च्या शेवटच्या आठवड्यात मॉन्सूनचा पाऊस किती पडेल? याचा पूर्वअंदाज जाहीर करण्यात येईल, असंही आयएमडीच्या वैज्ञानिकांनी स्पष्ट केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

SCROLL FOR NEXT