Monsoon Updates google
देश

केरळमध्ये मान्सूनचं आगमन; उकाड्याने त्रस्त जनता सुखावली!

केरळच्या दक्षिण भागांत गेल्या 24 तासांमध्ये कमी अधिक प्रमाणात हलका पाऊस सुरु आहे

सकाळ डिजिटल टीम

केरळच्या दक्षिण भागांत गेल्या 24 तासांमध्ये कमी अधिक प्रमाणात हलका पाऊस सुरु आहे

Monsoon Updates: काल मान्सूनचे केरळमध्ये आगमन झाल्यानंतर दरवर्षी पेक्षा वेळेआधी मान्सून दाखल झाला आहे. येत्या जुन महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे मान्सूनच्या आगमनाचे सर्व निकष पूर्ण झाले आहेत. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर पुढील सहा ते सात दिवसांमध्ये तळकोकणात आणि महाराष्ट्रात दाखल होत असतो. दरम्यान, केरळच्या दक्षिण भागांत गेल्या 24 तासांमध्ये कमी अधिक प्रमाणात हलका पाऊस सुरु झाला आहे. हा पाऊस वाऱ्यासह वर सरकत आहे.

केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर त्याच्या पुढचा वेग मंदावण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळं पुढील दोन आठवडे मान्सूचा वेग कमी राहू शकतो. मात्र, मान्सूनचा वेग कायम राहिल्यास मान्सून तळकोकणात ४ ते ५ जूनपर्यंत पोहोचू शकतो. तर, मुंबई आणि पुण्यात मान्सून ७ ते ८ जूनपर्यंत पोहोचू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

दरम्यान, मान्सून केरळमधील कन्नूर, पल्लकड आणि मदूराईमध्ये दाखल झाला असून तो वेगाने वर सरकत आहे. त्यामुळे केरळमधील काही भागांत हलक्या स्वरुपाचा पाऊस सुरु झाला आहे. मान्सून अंदमानमध्ये १६ मे रोजी दाखल झाला होता. आता मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. दुसरीकडे मान्सून भारतात दाखल होत असताना शेतकऱ्यांकडून देखील खरिपपूर्व कामांना वेग देण्यात येत आहे. आता मान्सूनच्या अगमानामुळे शेतकऱ्यांच्या शेतमशागतीच्या तयारीला वेग आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amazon Great Freedom Sale 2026: आजपासून मेगा सेल! Galaxy S25 Ultra 40 हजारांनी स्वस्त, पाहा कोणत्या वस्तूंवर मिळतोय मोठा डिस्काउंट

Koyna Dam Tailrace Water Issue : समुद्रात जाणारे कोयनेचे पाणी कोकणाला मिळणार का? पुन्हा नवे सर्वेक्षण सुरू; 'हा' निर्णय ठरवणार भविष्य

Mumbai News: 'स्वातंत्र्यदिनापूर्वी मोठी घटना घडणार, मुंबईत बॉम्बस्फोट करणार...', महापौर रितू तावडेंना धमकीचा मेल

Marathi News Live Updates : सीएसएमटी स्थानकातील वायफायवर सायबर हल्ला

Dr Bhushan Patwardhan: प्रज्ञानातून मानवकल्याणाचा भाव जागृत होईल: डॉ. भूषण पटवर्धन, ‘सकाळ प्रकाशन’तर्फे तीन पुस्तकांचे प्रकाशन

SCROLL FOR NEXT