monsoon google
देश

मान्सूनसाठी अनुकूल वातावरण; पुढील ४८ तासांत केरळमध्ये धडकणार

मोसमी वाऱ्यांसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याने केरळात मान्सून उद्या २७ मे रोजी दाखल होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

मोसमी वाऱ्यांसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याने केरळात मान्सून उद्या २७ मे रोजी दाखल होणार आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यात संमिश्र वातावरण पहायला मिळत आहे. यंदा वेळेआधीच मान्सून केरळमध्ये धडकणार असल्याची माहिती हवामान विभागाने (IMD) दिली आहे. काही दिवसांपूर्वी मान्सूनला (Monsoon) देशात दाखल होण्यास विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, मोसमी वाऱ्यांसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याने केरळात मान्सून उद्या २७ मे रोजी दाखल होणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. (Monsoon Update Keral)

दरम्यान, आता हवामान विभागाने ट्विट करत मान्सूनच्या प्रवासाबाबत माहिती दिली आहे. यात सांगितलं आहे की, नैऋत्येकडून मान्सून पुढे येत असून अरबी समुद्राच्या काही भागात तसेच मालदीव, कोमोरिन क्षेत्र आणि दक्षिण बंगालच्या उपसागरात तो सरकला आहे. त्यामुळे पुढील ४८ तास दक्षिण अरबी समुद्र, कोमोरिनचा काही भाग आणि संपूर्ण मालदीव, लक्षद्वीप बेटाच्या लगतच्या भागांवर मान्सूनसाठी परिस्थिती अनुकूल आहे. त्यामुळे विनाअडथळा मान्सूम केरळमध्ये दाखल होणार असल्याते भारतीय हवामान खात्याने सांगितले आहे.

केरळमध्ये (Kerala) २७ मे रोजी मान्सूनची (Monsoon) सुरुवात अपेक्षित असून, यंदा ९९ टक्के पाऊस अपेक्षित असल्याचा अंदाज आहे. पुढील ५ दिवसांत कोकण आणि गोवा प्रदेशात हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. राज्याच्या इतर भागातही हलका पाऊस पडेल, अशी माहिती मुंबईचे आयएमडी (IMD) च्या एका अधिकाऱ्याने दिली आहे. महाराष्ट्रात मान्सून जूनच्या पहिल्या आठवड्यात दाखल होण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.

मागच्या आठवड्यात केरळात जोरदार मान्सूनपूर्व पाऊस झाला होता. आता पावसाने विश्रांती घेतली आहे. पुढील काही तासांत नैऋत्य वारे पुढे सरकणार आहे. त्यामुळे सकारात्मक पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भात पुढील तीन ते चार दिवस पावसाची शक्यता आहे. दोन दिवसापूर्वी पावसाने विजर्भात हजेरी लावली होती. तसेच वाराही सुटण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT