monsoon latest update in maharashtra sakal
देश

पुढील 5 दिवसांत सरी बरसणार; 'या' राज्यांत गडगडाटासह वादळी पाऊस

राज्यासह देशातील छत्तीसगडमध्येही पुढील पाच दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.

सकाळ डिजिटल टीम

राज्यात शुक्रवारी मान्सूनने दाखल झाल्यानंतर संपूर्ण कोकणात पावसाची धुंवाधार बॅटिंग सुरु झाली. यानंतर मान्सून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये दाखल झाला. दरम्यान, आता पुन्हा एकदा कडक ऊन पडले असल्याने मान्सून पुन्हा गायब झाला असल्याचे चित्र आहे. पावसाची उपस्थिती अनियमित असल्याने संपूर्ण राज्यात सध्याच्या अपेक्षित पावसापेक्षा ४४ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. (monsoon latest update in maharashtra)

हवामान विभागाने आता पुन्हा एकदा पुढील पाच दिवसांत मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये गडगडाटासह वादळ आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. राज्यासह देशातील छत्तीसगडमध्येही पुढील पाच दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, 15 ते17 जून या कालावधीत संपूर्ण मध्य प्रदेश राज्यात आणि त्यानंतर 19 जून रोजी विदर्भात पाऊस होणार असल्याची माहिती हवामान विभागाने ट्विटद्वारे दिली आहे.

मान्सून दाखल झाल्यानंतर सध्या पावसाचे प्रमाण फारसे नसले तरी अरबी समुद्रात गुजरातपासून केरळपर्यंत किनारपट्टीला समांतर द्रोणीय स्थिती तसेच पश्चिमेकडून वाहणारे वारे यामुळे कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या पाच दिवसांमध्ये पावसाची उपस्थिती असेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. यातील काही ठिकाणी तुरळक, तर काही ठिकाणी सर्वदूर पावसाची शक्यता आहे.

दरम्यान, मुंबईमध्ये सोमवारी कमाल आणि किमान तापमानाचा पारा तुलनेत चढला आहे. पाऊस नसल्याने अनेकांनी पुन्हा उकडू लागल्याची तक्रार केली. मध्य महाराष्ट्रातही बहुतांश ठिकाणी कमाल तापमान पावसाअभावी चढे होते. अहमदनगर येथे सरासरीपेक्षा तब्बल पाच अंशांनी कमाल तापमानाचा पारा चढा असल्याची नोंद झाली आहे.

मान्सूनच्या हुलकावणीमुळे बळीराजा मात्र चिंतीत झाला आहे. मान्सून लवकर दाखल होणार या माहितीमुळे शेतकऱ्यांनी शेतीकामे आटोपून घेतली आहेत. हा काळ भातपेरणीसाठी महत्वाचा असतो मात्र अद्याप पावसाचा काही पत्ता नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आता पुढील पाच दिवस हवामान विभागाने पुन्हा एकदा पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT