देश

MOTN Survey: फडणवीस-शिंदे-अजितदादांच्या महायुतीवर भारी पडणार महाविकास आघाडी! 48 पैकी 26 जागांवर विजयाचा अंदाज

देशात येत्या काही दिवसांतच लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजण्याची शक्यता आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : देशात येत्या काही दिवसांतच लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी इंडिया टुडे आणि सी व्होटरनं 'देशाचा मूड काय?' हा सर्व्हे केला आहे. या सर्व्हेमधून संभाव्य निकाल आश्चर्यकारक असतील अशी माहिती समोर आली आहे. या सर्व्हेनुसार, महाराष्ट्रात महाविकास आघाडी ही फडणवीस-शिंदे-अजितदादा यांच्या महायुतीवर भारी पडताना दिसत आहे. (mood of the nation survey says mva wins 26 out of 48 seats in maharashtra)

महाराष्ट्रातील एकूण ४८ लोकसभेच्या जागांपैकी मविआला २६ जागांवर विजय मिळेल तर उर्वरित २२ जागांवर महायुतीला समाधान मानावं लागेल, असं चित्र आहे. तसेच महायुतीला महाराष्ट्रात ४०.५ टक्के मतं तर महाविकास आघाडीला ४४.५ टक्के मतं मिळतील असं दिसत आहे. त्यातही महायुतीतील तिन्ही पक्षांचे मिळून २२ तर महाविकास आघाडीतील काँग्रेसला १२, ठाकरेंच्या शिवसेनेला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला प्रत्येकी १४ जागा मिळतील असाही अंदाज आहे. (Latest Marathi News)

गेल्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएनं ४१ जागा जिंकल्या होत्या. यामध्ये २२ भाजपला तर १९ जागांवर शिवसेनेचे खासदार निवडणून आले होते. त्यावेळी शिवसेनेत फूट पडली नव्हती. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं एकत्र निवडणूक लढवली होती. त्यांना केवळ ६ जागांवर विजय मिळाला होता. यांपैकी राष्ट्रवादीला ४ तर काँग्रेसला एकच जागा मिळाली होती. तर औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगरमधून एमआयएमच्या इम्तियाज जलील यांनी विजय मिळवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटनमध्ये तांत्रिक बिघाडामुळे एअर ट्राफिक, हजारो उड्डाणे रद्द; जगभरातील विमानसेवेला फटका, विमानतळांवर प्रवाशांची गर्दी

Premnagarcha Maharaja: मुंबईत आगमनसोहळ्यात मोठी दुर्घटना, तातडीने गणेशमूर्तीचं विसर्जन, नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : मनोज जरांगे -पाटलांच्या उपोषणाचा आजचा बारावा दिवस, आतापर्यंत काय घडलं

Smart Meter Fire Uchgaon : उचगावमध्ये नवीन स्मार्ट मीटरने घेतला पेट; पहाटे घडलेल्या घटनेमुळे खळबळ, स्मार्ट मीटरच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह

मुख्यमंत्र्यांची मिमिक्री करणाऱ्याच्या मदतीने करायचा घोटाळे; भ्रष्टाचार, बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी बड्या अधिकाऱ्याला अटक

SCROLL FOR NEXT