Air Pollution India eSakal
देश

Air Pollution India : हवा प्रदूषणामुळे देशात वर्षाला वीस लाख बळी; आंतरराष्ट्रीय संशोधनात समोर आली धक्कादायक बाब

India Pollution Deaths : ‘बीएमजे’ या नियतकालिकात याबाबत संशोधन प्रकाशित झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

India Air Pollution Linked Deaths : देशात राजधानी दिल्लीसह प्रमुख शहरांतील हवाप्रदूषण वाढते आहे. त्यामुळे, आरोग्यालाही अनेक धोके निर्माण होत आहेत. देशात बाह्य हवाप्रदूषणाच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणामामुळे दरवर्षी २० लाखांहून अधिक जणांचा मृत्यू होत असल्याचे एका आंतरराष्ट्रीय संशोधनातून समोर आले आहे.

‘बीएमजे’ या नियतकालिकात याबाबत संशोधन प्रकाशित झाले आहे. हवाप्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूत भारताचा चीननंतर दुसरा क्रमांक लागतो. त्यामुळे, या दोन्ही देशांतील हवाप्रदूषणाला आळा घालण्याची गरज आहे.

कसे केले संशोधन?

जर्मनीतील मॅक्स प्लांक रसायनशास्त्र संस्थेतील संशोधकांच्या नेतृत्वाखालील पथकाने हे संशोधन केले. जीवाश्म इंधनाशी संबंधित हवाप्रदूषणामुळे होणारे मृत्यू तपासण्यासाठी नवीन मॉडेल वापरण्यात आले. जीवाश्म इंधनाऐवजी स्वच्छ, अपारंपरिक ऊर्जा वापरण्याच्या धोरणांमुळे आरोग्याला होणाऱ्या फायद्यांचेही मूल्यांकन करण्यात आले. लोकसंख्येची आकडेवारी, नासाच्या उपग्रहाने टिपलेले सूक्ष्म कण, वातावरणीय रसायनशास्त्र, एरोसोल आदींच्या आधारे चार परिस्थितींची कल्पना करून हे संशोधन करण्यात आले.

Air Pollution Deaths India

हवा प्रदूषणामुळे जगभरातील मृत्यू (२०१९)

८३ लाख - (हवेतील पीएम २.५ कणांमुळे होणारे मृत्यू)

५० लाख - यापैकी जीवाश्म इंधनाचे वार्षिक मृत्यू

४.६ लाख - जीवाश्म इंधन टाळल्याने रोखले जाणारे मृत्यू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Konkan Coastal Flood Risk : कोकण किनारपट्टीला मोठा धोका! यंदा पावसाळ्यात 23 दिवस समुद्राला 'उधाण'; 4.5 मीटरपेक्षा उंच लाटा उसळणार, 145 गावांना सतर्कतेचा इशारा

Solapur NCP Politics: साेलापूरमध्ये राष्ट्रवादीत ‘चलती’ कोणाची? अभिजित पाटील की संजयमामा, मेमध्ये मोठ्या घडामोडींचे संकेत!

Latest Marathi News Live : सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये दरोड्याचा कट उधळला, नऊ संशयित महिलांना आरपीएफ पोलिसांकडून अटक

लग्नसमारंभात मोठी दुर्घटना! बांधकामाचा स्लॅब कोसळून वऱ्हाडी खड्ड्यात पडले; अनेकजण जखमी, एकाचा मृत्यू

Shahu Maharaj Document : डोंगर गावात सापडलं 1709 मधील राजर्षी शाहू महाराजांचं राजाज्ञापत्र; काय आहे त्या कापडी पिशवीतलं गुपित? 10 पत्रांनी उलगडला इतिहास

SCROLL FOR NEXT