देश

चोवीस तासांमध्ये हजारांपेक्षा अधिक रूग्ण; आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली 

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये गेल्या २४ तासांत १ हजार ७५२ इतकी मोठी वाढ झाल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे, मागील एका दिवसात ३७ रूग्ण दगावले आहेत. या संसर्गाचा उद्रेक झाल्यानंतर देशव्यापी लॉकडाउनची घोषणा करण्यात आली होती, देशातील टाळेबंदीला महिनाभराचा कालावधी लोटून गेल्यानंतर विशेषतः मागील चोवीस तासांत कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झालेली ही सर्वात मोठी वाढ मानली जात आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार २३ हजार ४५२ पैकी १७ हजार ९१५ रुग्ण हे सक्रिय कोरोनाग्रस्त आहेत. आतापर्यंत ४ हजार ८१३ लोकांनी कोरोनाला पराभूत केले आहे. देशातील मृतांची संख्या ७२४ वर पोचली आहे. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून म्हणजे बारा १३ एप्रिलनंतर कोरोनग्रस्तांच्या देशभरातील संख्येत सातत्याने वाढ होत असल्याचे दिसत आहे. विशेषतः मुंबई आणि पुण्यासह ११ महानगरे आणि महाराष्ट्र, दिल्ली, मध्यप्रदेश आणि गुजरात या चार राज्यांना वाढता प्रादुर्भाव आणि रुग्णसंख्येलाही तोंड द्यावे लागत आहे. रुग्णसंख्या दर दिवशी काही शेकड्यांनी वाढण्याचा हा कल चिंताजनक असल्याचे सार्वत्रिक निरीक्षण नोंदवले जात असले सरकारचे मत वेगळे आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

देखरेख हेच आयुध 
कोरोनाविरुद्धच्या लढाईत संभाव्य रुग्णांवर नकळत देखरेख ठेवणे हेच यंत्रणांचे प्रमुख आयुध बनले आहे. देशात लॉकडाउन वेळीच जारी केला नसता आज २३ हजारांवर दिसणारी रुग्णसंख्या प्रत्यक्षात एक लाखाच्या घरात पोचली असती, असे नीती आयोगाचे सदस्य व कोविड-१९ वकील उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष डॉ. विनोद के पॉल यांचे म्हणणे आहे. 

वेग मंदावला 
पत्र सूचना कार्यालयाच्या एका अहवालानुसार लॉकडाउन जारी होण्याआधी २१ मार्च रोजी देशात कोरोनाग्रस्तांची संख्या दर तीन दिवसांनी दुप्पट होत होती. लॉकडाउन च्या पहिल्या आठवड्यात म्हणजे २४ ते ३० मार्च या काळात हे प्रमाण ५.३ दिवसांवर पोहोचले. ३१ मार्च ते सहा एप्रिल या काळात ते ४.२ दिवस इतके झाले. १३ एप्रिल पर्यंतच्या पुढच्या आठवड्यात यामध्ये पुन्हा घसरण झाली. २० एप्रिल पर्यंतच्या चौथ्या आठवड्यात रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा दर ८.६ दिवस इतका झाला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dilip Walse Patil : दूध भेसळ प्रकरणावरून बदनामी करणाऱ्यांना १०० कोटींची नोटीस: उच्च न्यायालयात दावा दाखल करणार

ECI SIR: ‘एसआयआर’ वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्तांची बैठक; मुद्देनिहाय स्पष्टीकरण...

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये ट्रॅक्टर वेल्डिंगवेळी स्फोट, चौघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

Uruli Kanchan Ganpati Visarjan : उरुळी कांचन येथील गणेश विसर्जन मिरवणूक रंगली १५ तास! मात्र डीजेला दिला मंडळानी फाटा

Beed News : करपलेली पिके अन् डोळ्यात अश्रू... बीडच्या बांधावर 'पालकमंत्री' सुनेत्रा पवार अन 'पंकजाताई मुंडे'

SCROLL FOR NEXT