Lazy County Sakal
देश

Lazy Country : सर्वात ॲक्टिव मोदींच्या देशातील नागरिक आळसावलेलेच; संशोधतून खुलासा

जगभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा डंका आहे हे आपल्यापैकी सर्वांनाच माहिती आहे.

सकाळ डिजिटल टीम

Most Lazy Countries : जगभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा डंका आहे हे आपल्यापैकी सर्वांनाच माहिती आहे. मोदींच्या फिटनेसह त्यांच्याप्रमाणे फॅशन करणाऱ्यांची संख्यादेखील लक्षणीय आहे. नागरिकांनी फिट रहावे यासाठी ते नियमित योगा करण्याचा सल्ला देतात. त्यांच्या याच सवयीमुळे त्यांना मोस्ट ॲक्टिव पॉलिटिशियन असेदेखील संबोधले जाते. मात्र, सर्वात अॅक्टिव पंतप्रधानांच्या देशातील नागरिक आळसावलेले असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे.

हेही वाचा - Credit Score: असा वाढवा तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’

एखादं काम केले नाही तर अनेकांना तुम्ही किती आळशी आहात असे म्हणताना ऐकले असेल. प्रत्येकाच्या घरात असा एकतरी आळशी धोंडा असतोच. मात्रस अनेकांना जगातील सर्वात जास्त आळशी लोकं कोणत्या देशात आहेत. असा प्रश्न पडतो. अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीने केलेल्या एका संशोधनात जगातील आळशी देशांबाबत भाष्य केले आहे. या संशोधनात सर्वात आळशी देश आणि सर्वात सक्रीय देशांची नावे सांगितली आहेत. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीने 46 देशांतील 7 लाख लोकांवर हे संशोधन केले, चला तर मग जाणून घेऊया आळशी देशांमध्ये भारताचा नंबर नेमक्या कुठे आहे.

जगातील सर्वात आळशी देश

जगातील सर्वात आळशी देश इंडोनेशिया आहे. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधनानुसार इंडोनेशियातील लोक दररोज सरासरी 3513 पावले चालतात. त्याचबरोबर या यादीत अमेरिकेचाही समावेश आहे. अमेरिकेतील लोक दररोज साधारण 4774 पावले चालतात.

जगातील सर्वात सक्रिय देश कोणता

संशोधनानुसार हाँगकाँग हा जगातील सर्वात सक्रिय देश आहे. या देशातील लोक दररोज सरासरी 6880 पावले चालतात. त्याच वेळी, चीन, युक्रेन, जपानमधील लोक देखील सरासरी 6000 पावले चालतात. या संशोधनासाठी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीने 46 देशांतील 7 लाख लोकांच्या स्मार्ट फोनमध्ये बसवलेल्या स्टेप काउंटरची मदत घेतली. हा अभ्यास मानवी विकासावर केलेल्या सर्व संशोधनांपेक्षा 1000 पट मोठा आहे.

भारत कितव्या स्थानावर

स्टॅनफोर्ड विद्यापीठाने जारी 46 देशांच्या यादीत भारताचा क्रमांक 39 व्या स्थानावर आहेत. या अहवालानुसार, भारतातील लोक एका दिवसात सरासरी फक्त 4297 पावले चालतात. साधारणपणे एका निरोगी व्यक्तीने दिवसभरात सरासरी किमान 10,000 पावले चालणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

भारतीय महिलांची स्थिती वाईट

या संशोधनात असेही समोर आले आहे की, भारतीय पुरुषांच्या तुलनेत भारतीय महिला दिवसभरात कमी चालतात. भारतीय पुरुष एका दिवसात 4606 पावले चालतात, तर भारतीय महिला एका दिवसात केवळ 3684 पावले चालतात. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ज्या महिलांना लठ्ठपणाची समस्या आहे. त्या महिला त्रासामुळे अधिक कमी चालतात. ज्या महिलांना लठ्ठपणाची समस्या आहे त्यांनी जास्तीत जास्त चालावे असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. मात्र, भारतात हे चित्र उलट असल्याचे या संशोधनातून समोर आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Mahayuti Manifesto : महायुतीचा वचननामा जाहीर; मराठी माणसाला मुंबईतच घर ते बेस्ट प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत अन् बरंच काही...

Pune News: मांढरदेवीच्या यात्रेला अभूतपूर्व गर्दी; भोर मार्गावर दहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा, दाेन्ही बाजुला वाहतूक जाम!

Ankita Bhandari Murder : काय आहे अंकिता भंडारी खून प्रकरण? मुख्यमंत्र्यांनी दिले CBI चौकशीचे आदेश; जुन्या जखमा आणि नवा वाद!

Rhino Attacks Tiger : वाघाच्या जबड्यातून पिल्लाची सुटका! दुधवा जंगलात गेंड्याच्या मादीचा वाघावर थरारक हल्ला; दुर्मिळ दृश्य video viral!

Black Saree Look: काळ्या साडीतला बॉलिवूड टच देईल तुम्हाला एलिगंट अन् रॉयल लूक, कौतुक नक्की मिळेल!

SCROLL FOR NEXT