mother fights off kidnappers saves four year old child video viral 
देश

अपहरणकर्त्यांशी भिडली आई; व्हिडिओ व्हायरल...

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : एका चार वर्षीय मुलीचे दोघांनी अपहरण करण्याचा प्रयत्न केला. पण, अपहरणकर्त्यांशी आई भिडली आणि मुलीची सुखरूप सुटका केली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पूर्व दिल्लीतील शकरपूरमध्ये भागात ही घटना घडली असून, मुलीच्या काकांनीच अपहरणाचा कट रचल्याची माहिती पुढे आली आहे.

शकरपूर भागात घडलेल्या या घटनेत दोन भावांमध्ये व्यवहारावरून वाद होता. परिणाणी या वादातून एका भावाने आपल्याच भावाच्या मुलीचे अपहरण करण्याचा कट रचला. दोघांना अपहरण करण्याची त्याने सुपारी दिली होती. दोघे जण दुचाकीवरून मुलीच्या आले होते. मुलीच्या आईकडे त्यांनी पाणी मागितले. महिला पाणी देत असताना एकाने मुलीला उचलून दुचाकीवरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण, मुलीच्या आईने प्रसंगावधान दाखवत दुचाकीवरून मुलीला खाली खेचले. यामुळे दुचाकीवरून ते खाली पडले. शिवाय, महिलेने जोरजोरात ओरडायला सुरवात केली. आरडाओरडा ऐकून शेजारी पळत आले आणि अपहरणकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. एका व्यक्तीने रस्त्याच्या मध्यभागी आपली गाडी लावून अपहरणकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अपहरणकर्त्यांनी दुचाकी सोडून पिस्तूल दाखवून पळण्यास सरुवात केली.

दरम्यान, दुचाकीच्या नंबरवरून मालकाची ओळख पटली आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी एका तासाच्या आत या प्रकरणाचा छडा लावला. अपहरणाचे मास्टरमाईंड असलेल्या काकांच्या घरावर छापा मारत त्याला अटक केली. दोन्ही अपहरणकर्त्यांचा शोध सुरू आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

Ashadi Wari 2025: पंढरीची वारी पोचली लंडनच्या दारी!विठ्ठल-रुक्मिणीच्या पादुकांसह २२ देशांतून ७० दिवसांचा प्रवास

SCROLL FOR NEXT