Madhya Pradesh Crime News esakal
देश

मातृत्वाला काळीमा! अवघ्या 15 दिवसांच्या बाळाला विकून आईनं खरेदी केला टीव्ही, कुलर

सकाळ डिजिटल टीम

इंदूरमध्ये आईच्या प्रेमाला काळीमा फासणारी घटना समोर आलीय.

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) इंदूरमध्ये आईच्या प्रेमाला काळीमा फासणारी घटना समोर आलीय. इथं एका आईनं आपलं 15 दिवसांचं नवजात बालक विकलंय. मुलाला विकून मिळालेल्या पैशातून आईनं फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशिन अशा वस्तू खरेदी केल्या आहेत. आरोपी आईनं पतीच्या संमतीनं हा व्यवहार केला होता. या प्रकरणी पोलिसांनी (Indore Police) एकूण आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यापैकी सहा आरोपींना पोलिसांनी अटकही केलीय.

मिळालेल्या माहितीनुसार, इंदूरच्या हीरा नगर भागात राहणाऱ्या शायना बी या महिलेनं पोलिसांना सांगितलं की, 'पतीला आमच्या बाळावर संशय होता. त्यामुळं पतीला माझा गर्भपात करायचा होता, पण आमच्याकडं वेळ खूप कमी असल्यानं आम्ही दलालांमार्फत मूल विकण्याचा बेत आखला. आम्ही आमचं बाळ देवास येथील एका जोडप्याला विकलं.' हे मूल लीना नावाच्या महिलेनं विकत घेतल्याचं पोलिसांनी सांगितलं. लीना म्हणाली की, 'अलीकडंच तिच्या दोन मुलांचा मृत्यू झाला होता. त्यामुळं तिनं मुलाला साडेपाच लाखांना विकत घेतलं.'

पोलिसांनी सांगितलं की, मुलाची विक्री केल्यानंतर मिळालेल्या पैशातून महिलेनं टीव्ही, फ्रीज, कुलर आणि वॉशिंग मशीन या वस्तू खरेदी केल्या होत्या, त्या आता जप्त करण्यात आल्या आहेत. सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या प्रकरणाची माहिती देण्यात आली. याप्रकरणी आरोपी आई शायना बी हिच्यासह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यापैकी एक अल्पवयीनही आहे. यातील सहा आरोपींना अटक करण्यात आली असून दोन सध्या फरार आहेत. लवकरच फरार आरोपींनाही जेरबंद करण्यात येईल, असा दावा पोलिसांनी केलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Leopard Attack in Satara : पाटण तालुक्यात बिबट्याची दहशत! गवत कापणाऱ्या महिलेवर झडप; हाताचा तोडला लचका, अचानक झालेल्या हल्ल्याने...

Beed News: बीडमध्ये नक्की चाललंय तरी काय? तलावात आढळला अनोळखी मृतदेह; अंगावर एकही कपडा नाही, शरीर पूर्णपणे कुजलेलं...

भाजप आमदाराने मुलाच्या लग्नात वाजवले ७० लाखांचे फटाके, शाही लग्नसोहळ्यातील VIDEO VIRAL

लग्नसंस्थेवर आधारित लग्नाचा शॉट या नव्या सिनेमाची घोषणा; मोशन पोस्टर सोशल मीडियावर रिलीज

8th Pay Commission Explained: पगार किती वाढणार? उशिरा लागू झाला तर थकबाकी किती मिळेल? पगारवाढीचं संपूर्ण गणित उघड

SCROLL FOR NEXT