amar singh 
देश

राज्यसभा खासदार अमर सिंग यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा

लखनऊ - समाजवादी पक्षाचे माजी नेते आणि राज्यसभा खासदार अमर सिंग यांचे  वयाच्या 64 व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर सिंगापूर इथं रुग्णालयात उपचार सुरू होते. किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियाही झाली होती. उत्तर प्रदेशातील दिग्गज नेत्यांपैकी एक असेलेल्या अमर सिंग हे समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंग यादव यांचे निकटवर्तीय म्हणूनही ओळखले जात होते. सध्या ते उत्तर प्रदेशातून राज्यसभा खासदार होते. 

समाजवादी पक्षातून बाहेर पडल्यानंतर राजकारणातही ते फारसे सक्रीय नव्हते. 5 जुलै 2016 मध्ये त्यांची राज्यसभेच्या खासदारपदी निवड झाली होती. दरम्यान, आजारी पडण्याआधीच त्यांची भाजपशी जवळीक वाढली होती. त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवातही राज्यसभेपासूनच झाली होती. 1996 मध्ये ते पहिल्यांदा राज्यसभा खासदार झाले होते. त्यानंतर 2002 आणि 2008 मध्येही ते राज्यसभेचे खासदार झाले होते. 

समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंग यादव यांच्याशिवाय महानायक अमिताभ बच्चन यांच्याशी त्यांची खास मैत्री होती. बच्चन कुटुंबियांचे जवळचे संबंध होते. गेल्या काही वर्षांत त्यांच्या नात्यात कटुपणाही आला होता. फेब्रुवारी महिन्यात अमर सिंग यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून अमिताभ बच्चन यांची माफी मागितली होती.

काँग्रेसचं सरकार वाचवलं होतं
काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीचं सरकार 2004मध्ये स्थापन झालं होतं. त्यावेळी डाव्या पक्षांनी या सरकारला पाठिंबा दिला होता. परंतु, थेट परकीय गुंतवणुकीच्या मुद्यावरून डावे पक्ष काँग्रेसच्या विरोधात केले आणि सरकार अल्पमतात आलं. त्यावेळी समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव आणि त्यावेळी पक्षात सक्रीय असणारे अमरसिंह यांनी खासदारांची गोळाबेरीज करून काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकार वाचवलं होतं.

सभागृहात खासदारांची गोळाबेरीज करण्यात अमरसिंह यांनी खूप मोठी भूमिका बजावली होती. त्यानंतर अमरसिंह राष्ट्रीय राजकारणात एकदम चर्चेत आले होते. परंतु, त्यांची कारकिर्द अनेक वादांनी गाजली होती. महानायक अमिताभ बच्चन यांच्याशी एकेकाळी कौटुंबिक संबंध असलेल्या अमरसिंह आणि बच्चन कुटुंबात अचानक वादाची ठिणगी पडली. त्यानंतर त्यांचे संबंध दुरावले. मध्यंतरी सिंगापूरमध्ये उपचार घेत असलेल्या अमरसिंह यांचा फोटो शेअर करून, बच्चन यांनी त्यांना लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Edible Oil Import Duty Cut : सूर्यफूल, सोयाबीन आणि पाम तेल होणार स्वस्त; केंद्र सरकारकडून खाद्यतेलाच्या आयात शुल्कात मोठी कपात, सामान्यांना दिलासा

धोनीचा असा जल्लोष परत कधीचं पाहिला नाही! पहिला T20 World Cup जिंकल्यावरच्या सेलिब्रेशनचा Viral Video

अजय देवगणच्या अडचणीत वाढ? मुंबईतील जुहू बंगल्यावर BMC कारवाई, पण नक्की कारण काय?

Congress MLA Resignation : मतदार संघात दुष्काळ जाहीर न केल्याने काँग्रेस आमदार पाटील यांचा राजीनामा

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट; अहेरी दक्षिण भागात मुसळधार पावसाची सुरुवात

SCROLL FOR NEXT