MP Assembly Election BJP in trouble over Tomar financial transaction video news 
देश

MP Assembly Election: तोमर व्हिडिओवरून भाजप अडचणीत; काँग्रेस पक्षाकडून भाजपला घेरण्याचा प्रयत्न

- नरेश हाळणोर

MP Assembly Election : केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांचा मुलगा रामू तोमर यांचा आर्थिक व्यवहारासंदर्भातील तिसरा व्हिडिओ आल्याने भाजपच्या अडचणी वाढल्या आहेत. (MP Assembly Election BJP in trouble over Tomar financial transaction video news)

दुसरीकडे काँग्रेस सखोल चौकशीची मागणी करताना तोमर यांची नार्कोटिक्स करा अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बी डी मिश्रा यांनी केली.

केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांचा मुलगा रामू उर्फ देवेंद्र सिंह तोमर यांचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एका आर्थिक व्यवहारा संदर्भात पाचशे करोड रुपयांची चर्चा असल्याचे बोलले जाते.

त्यावरून काँग्रेस पक्षाकडून भाजपला सातत्याने घेरण्याचा प्रयत्न होत असताना आणखी एक व्हिडिओ आल्याने भाजपच्या अडचणी वाढल्याचे दिसते आहे. यावरून भाजपने आत्तापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बीडी मिश्रा यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करताना तोमर यांची नार्कोटेक्स करा असे म्हटले. ईडी-सीबीआय या प्रकरणाची चौकशी करणार नाही असा खोचक टोलाही मिश्रा यांनी काही प्रसार माध्यमांशी बोलताना लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जंतर मंतर आंदोलन स्थळांच्या यादीतून वगळलं, दिले ३ पर्याय; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारसीनंतर दिल्ली पोलिसांचा निर्णय

Pune News: चाकणमध्ये हृदयद्रावक घटना! मोबाईलवरून वाद, वडिलांच्या दोन थपडा अन् १७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, सायकलनेच दिला सुगावा..

माधुरी दीक्षितने डॉक्टर असलेल्या नेनेंसोबत लग्न का केलं? सोनाली बेंद्रेसमोर सांगितलं खरं कारण; म्हणाली- मी अशा माणसाशी लग्न केलंत जो...

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील आंदोलनांसाठी जंतरमंतर बंद; निदर्शनांसाठी तीन नवी ठिकाणे निश्चित

Panvel News: पनवेलचा 'ताप' वाढला! धोक्याची घंटा; पर्यावरण अहवालात दीड अंशाच्या वृद्धीची नोंद

SCROLL FOR NEXT