MP Assembly Election 
देश

MP Assembly Election: मध्य प्रदेशातील 'या' 6 नेत्यांवर देशाचं लक्ष, 'मामा' गड जिंकणार की काँग्रेसला बहुमत मिळणार?

Sandip Kapde

MP Assembly Election: 2023 च्या विधानसभा निवडणुकीत देशातील सर्व नेत्यांचे लक्ष मध्य प्रदेशात असेल. या निवडणुकांचे निकाल ३ डिसेंबरला जाहीर होतील. यावेळी जनतेने कोणाच्या बाजूने निकाल दिला, हे 3 डिसेंबरलाच कळेल. यापूर्वी मध्य प्रदेशात काँग्रेसरकारला मताधिक्य मिळाले होते. मात्र भाजपने काँग्रेसमध्ये खिंडार पाडले. काँग्रेसमधील अनेक आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे यावेळी मतदारांनी कुणाला संधी दिली हे ३ तारखेला स्पष्ट होईल.

एक मात्र स्पष्ट आहे की मध्य प्रदेशात काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत होणार आहे. भाजपने सरकार पाडल्याचा वचपा काँग्रेस काढणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पाहिले तर 2018 मध्ये झालेल्या निवडणुकीत मध्य प्रदेशातील 230 विधानसभा जागांवर कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळू शकले नाही. त्या वेळी राज्यात अशा सुमारे 10 जागा होत्या जिथे विजय-पराजयाचे अंतर 1000 पेक्षा कमी होते. त्यापैकी 7 जागा एकट्या काँग्रेसने जिंकल्या.

राज्यात अशा 10 जागा होत्या जिथे विजय-पराजयामधील फरक 40 हजारांहून अधिक होता, त्यापैकी 7 जागा भाजपने जिंकल्या. यावेळी मध्य प्रदेशातील गेल्या तीन विधानसभा निवडणुकांमधील मतदानाचा विक्रम मोडला गेला. मतदारांनी 80 टक्के मतदान करून विक्रम केला आहे. मध्य प्रदेशातील 6 बड्या नेत्यांबाबत आपण जाणून घेऊया. हे नेते म्हणजे त्यांच्या पक्षाचा प्रमुख चेहरे आहेत.

मध्य प्रदेशातील 6 मोठे नेते-

कमलनाथ

कमलनाथ काँग्रेसचे मोठे नेते आहेत. त्यांनी यावेळी राज्यातील छिंदवाडा जिल्ह्यातून विधानसभा निवडणूक लढवली आहे. छिंदवाडामधील यावेळची निवडणूक अतितटीची मानली जात आहे. खरे तर, 2019 मध्ये राज्याचे मुख्यमंत्री होण्यासाठी पोटनिवडणुकीत छिंदवाडा विधानसभा जागा जिंकण्यापूर्वी, कमलनाथ जवळपास 40 वर्षे छिंदवाडा येथून खासदारही होते. 2019 मध्ये कमलनाथ यांनी भाजपचे युवा उमेदवार बंटी साहू यांचा पराभव केला होत. मात्र, यावेळी विधानसभा निवडणुकीत पुन्हा त्यांच्या विरोधात बंटी उभे राहिले आहे. यावेळी काँग्रेसने छिंदवाडामध्ये 7 पैकी 5 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

शिवराज सिंह चौहान

आता राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आणि भाजपचे उमेदवार शिवराज सिंह चौहान यांनी मध्य प्रदेशच्या 230 विधानसभा जागांपैकी सर्वात हॉट सीट असलेल्या बुधनी येथून विधानसभा निवडणूक लढवली आहे. यावेळी काँग्रेसने अभिनेता विक्रम मस्ताल यांना येथून उमेदवारी दिली आहे. शिवराज सिंह 2005 पासून राज्याचे प्रमुख आहेत. 2018 मध्ये याच बुधनी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसने शिवराज यांच्या विरोधात अरुण यादव यांना तिकीट दिले होते. तेव्हा शिवराज सिंह यांनी त्यांचा 58,999 मतांनी पराभव केला होता. पण यावेळी भाजपने पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवली आहे. शिवराज सिंह चौहान यांना मध्य प्रदेशात 'मामा' असेही संबोधले जाते.

कैलास विजयवर्गीय

मध्य प्रदेशातील इंदूर हे राजकीयदृष्ट्या खूप महत्त्वाचं मानलं जातं. यावेळी भाजपचे दिग्गज नेते कैलाश विजयवर्गीय इंदूर-1 विधानसभा जागेसाठी रिंगणात आहेत. कैलाश विजयवर्गीय यांच्यासमोर काँग्रेसने संजय शुक्ला यांना तिकीट दिले आहे. विशेष म्हणजे कैलाश विजयवर्गीय 10 वर्षांनंतर पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. मात्र, याआधी त्यांनी इंदूरमधील वेगवेगळ्या जागांवर सलग 6 वेळा निवडणूक जिंकली होती.

प्रल्हादसिंग पटेल

मध्य प्रदेशातील नरसिंगपूर विधानसभेच्या जागेवर अत्यंत चुरशीची लढत होणार असून, ही लढत रंजक आहे. यावेळी भाजपने विद्यमान आमदार जलमसिंह पटेल यांना तिकीट दिलेले नाही. त्यांच्या जागी त्यांचे मोठे बंधू आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांना तिकीट देण्यात आले. यावेळी काँग्रेसने केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांच्या विरोधात लखन सिंग पटेल यांना उमेदवारी दिली आहे. अशा स्थितीत आता येथे पटेल विरुद्ध पटेल असे समीकरण तयार झाले आहे. जलमसिंह नरसिंगपूरमधून दोनदा आमदार झाले आहेत आणि यावेळी त्यांचे मोठे बंधू प्रल्हाद येथून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. (Latest Marathi News)

नरोत्तम मिश्रा

दतिया विधानसभेची जागा ही राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांची पारंपारिक जागा आहे. दतिया मतदारसंघातून नरोत्तम मिश्रा पुन्हा एकदा भाजपच्या तिकिटावर रिंगणात आहेत, तर काँग्रेसने यावेळी नरोत्तम मिश्रा यांना आव्हान देण्यासाठी राजेंद्र भारती यांना तिकीट दिले आहे. 2018 मध्ये नरोत्तम मिश्रा यांनी 2,656 मतांनी विजय मिळवला होता. मात्र यावेळी चुरशीची स्पर्धा होणार असल्याचे मानले जात आहे.

जीतू पटवारी -

जितू पटवारीने वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली आहे. विधानसभा निवडणुकीत काही जागा अशा आहेत ज्यांवर सर्वांचे लक्ष असेल. यापैकी एक जागा इंदूरची राऊ सीट आहे. राहुल गांधींचे निकटवर्तीय आणि काँग्रेसचे लोकप्रिय नेते जितू पटवारी यांच्यामुळे भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या इंदूर जिल्ह्यातील व्हीआयपी सीट राऊळमध्ये काँग्रेसने गेल्या दोन निवडणुकांमध्ये आपली ताकद दाखवली आहे.

यावेळी भाजपने या जागेवरून मधू वर्मा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. जीतू हे मध्य प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष देखील आहेत. याआधी ते राज्यात पक्षाचे सचिव होते. जितू हे युवक काँग्रेसचे जिल्हा आणि प्रदेशाध्यक्षही राहिले आहेत. 2018 मध्ये जेव्हा कमलनाथ सरकार स्थापन झाले तेव्हा त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जाही देण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

रात्री बसमध्ये झोपलेली, सीटच्या मागून कमरेत हात; सई ताम्हणकरने तोच हात पकडला आणि... स्वतः सांगितला तो प्रसंग

Agricultural Crime : रात्रीतून फळबागेतील डाळिंब लंपास चौसाळ्यातील घटना, गुन्हा नोंदविण्यासाठी वजन-किमतीचा मुद्दा ठरतोय कळीचा

Video : "यापेक्षा कार्टून बरं" जानकी-हृषीकेशमध्ये येणार दुरावा ; घरोघरी मातीच्या चुलीवर प्रेक्षक वैतागले

Share Market: शेवटच्या तासात शेअर बाजाराचा यू-टर्न! घसरणीनंतर सेन्सेक्स वाढीसह बंद; तर निफ्टी...; वाचा बाजाराची स्थिती

SCROLL FOR NEXT