MP Sanjay Raut On Israel Palestine Conflict PM modi Marathi Political news  Esakal
देश

Israel Palestine Conflict : 'इस्त्राइलकडून पेगासीस, मोसादची मदत मिळालं म्हणून...'; राऊतांचा PM मोदींवर घणाघात

Raut verbal attack on PM Modi: खासदार संजय राऊतांनी इस्त्राइल-हमास संघर्षावर भाष्य केलं आहे.

रोहित कणसे

इस्त्राइल आणि हमास यांच्यात युद्ध पेटलं असून या संघर्षात आतापर्यंत जवळपास १६०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर हजारो जखमी झाले आहेत. दरम्यान इस्त्राइलवर झालेल्या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्ही इस्त्राइलच्या पाठिशी उभे असल्याचे म्हटले होते.

यानंतर आता शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. तु्म्हाला इस्त्राइलकडून पेगासीस आणि मोसादची मदत मिळाल्याने जमिनी परिस्थिती बदलत नाही असे राऊत म्हणाले आहेत.

शनिवारी दहशतवादी संघटना हमासने इस्त्राइलच्या प्रमुख शहरांवर जवळपास ५,००० क्षेपणास्त्र डागली. यानंतर इस्त्राइलने स्टेट ऑफ वॉर जाहीर करत हमासच्या ठिकाणांवर हल्ले सुरु केले. यादरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली. यामध्ये इस्रायलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वृत्ताने खूप धक्का बसला. आमच्या प्रार्थना निष्पाप पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत. या कठीण प्रसंगी आम्ही इस्रायलच्या पाठीशी उभे आहोत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

राऊत काय म्हणाले...

पत्रकार परिषदेत माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, भारत हा जगाच्या पाठीवरील पहिला देश आहे ज्याने युनायटेड नेशनमध्ये पॅलेस्टाइनला देश म्हणून मान्यता दिली. अटल बिहारी वाजपेयी यांचं भाषण ऐका. पॅलेस्टाइनवरीत इस्त्राइ कसं अन्याय करतंय, त्यांची जमीन कशी हडपून त्यांना कसं बाहेर काढलं हा इतिहास आहे.

आता इस्त्राइलकडून तुम्हाला पेगासस मिळालं, इतर काही गोष्टी, मोसादची मदत मिळाली म्हणून जमीनी वस्तुस्थिती बदलत नाही. यासर अराफत आणि इंदिरा गांधींचं बहिण भावाचं नातं होतं, हा इतिहास लक्षात घ्या असेही संजय राऊत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT