Protest Sakal
देश

Muhammad Paigambar Row: वादग्रस्त पोस्टप्रकरणी बंगालमधून भाजप नेत्याला अटक

मोहम्मद पैगंबरावरील वादग्रस्त वक्तव्यामुळे देशभरात हिंसाचार चालू आहे.

सकाळ डिजिटल टीम

कोलकत्ता : मोहम्मद पैगंबरावरील वादग्रस्त वक्तव्यामुळे देशभरात हिंसाचार चालू आहे. दरम्यान काल झारखंडमधील रांची येथे उसळलेल्या आंदोलनात दोघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर काल जवळपास २०० ते २५० लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. आज पश्चिम बंगालमधील एका भाजप नेत्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. भाजप नेते चंदन जना यांनी फेसबुकवर पैगंबरावर टीका करणारी आक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्यावरून त्यांना अटक करण्यात आली आहे.

(Muhammab Paigambar Row Updates)

भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांनी इस्लामचे धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानतंर आखाती देशांकडून भारतावर टीका करण्यात आली आहे. काही इस्लामिक देशांनी मोदींचे फोटो कचराकुंडीवर लावून भारताचा निषेध व्यक्त केला होता. त्यांनातर भारतातील मुस्लिम बांधवांनी नुपूर शर्मा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात असून आंदोलन केले जात आहे.

दरम्यान भाजपने नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांची पक्षातून हकालपट्टी केली असून त्यांच्यावर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातही या वक्तव्याचे पडसाद उमटले असून औरंगाबाद, सोलापूर अशा ठिकाणी आंदोलन करण्यात आले आहे. देशभरातील अनेक ठिकाणी आंदोलने होत असून जवळपास ५ हजार अज्ञात आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

झारखंड, बंगाल, उत्तरप्रदेशमधील अनेक ठिकाणी हिंसाचार चालू आहेत. दरम्यान केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी या हिंसाचारातील आरोपीवर जबर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. हिंसाचर रोखण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात असल्याची माहिती मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amruta Fadnavis Fugdi Video : 'पंढरपुरात विठूरायाची भक्ती अन्...'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-अमृता फडणवीसांनी घातली फुगडी, पाहा व्हायरल व्हिडिओ

आजचे पंचांग आणि दिनविशेष - २५ जुलै २०२६

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : पंढरपूर कॉरिडॉरचे काम कोणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maharashtra Loan Waiver : शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर! 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांचा समावेश; तुमचे नाव 'या' पोर्टलवर करा चेक

Ashadhi Ekadashi : महापूजेवेळीही भाविकांसाठी श्री विठ्ठलाचे मुखदर्शन सुरू; पदस्पर्श दर्शनाची रांग मंदिरापासून 20 किमी अंतरावर, पंढरपुरात 30 लाखांहून अधिक भाविकांचा महापूर

SCROLL FOR NEXT