Mukesh Ambani Reliance completes acquisition of Lotus Chocolate company  
देश

Mukesh Ambani : नातवंडांचे लाड पुरवायला अंबानींनी विकत घेतली थेट चॉकलेट कंपनी! जिओ, MI नंतर मोठी बिझनेस डिल

सकाळ डिजिटल टीम

आयपीएल फ्रेचायजी मुंबई इंडीयन्सचे मालक आणि आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी पुन्हा एकदा चर्चेत आहेत. कारण त्यांची कंपनी रिलायन्स रिटेलने आणखी एक मोठी डिल पूर्ण केली असून अंबानी यांच्या पोर्टफोलियोमध्ये आणखी एका बड्या कंपीनीचा समावेश झाला आहे. यावेळी अंबानींच्या रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (RCPL) ने लोटस चॉकलेट लिमिटेड या कंपनीचा ५१ टक्के हिस्सा विकत घेतला आहे. नुकतेच त्यांच्या कंपनीकडून हे अधिगृहण पूर्ण झाल्यानंतर याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

रिपोर्टनुसार रिलायंस कंज्यूमर प्रोडक्ट्स लिमिटेडने लोटस चॉकलेच कंपनी लिमिटेडमध्ये मोठा हिस्सा विकत घेतला असून ही डील तब्बल ७४ कोटी रुपयांत पूर्ण करण्यात आली. या डील अंतर्गत RCPL ने लोटस चॉकलेट चे नॉन कम्यूलेटिव्ह रिडीमेबल प्रेफरंस शेअर्ससाठी २५ कोटी रुपये जिले आणि कंपनीचा ताबा घेतला आहे. रिलायंसकडून ओपन ऑफरच्या मदतीने हे शेअर्सचे अधिग्रहण पूर्ण करण्यात आले.

RCPL ने मार्केट रेग्युलेटर सेबीच्या टेकओव्हर नियमांनुसार लोटस इक्विटी शेखर्सचा अतिरिक्त २६ टक्के हिस्सा विकत घेण्याची सार्वजनिक घोषणा केली होती. आरआरवीएल मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वात चालणारी रिलायंस इंडस्ट्रीजची सहाय्यक कंपनी आणि आरआएल समूहाच्या रिटेल व्यवसायांसाठीची होल्डिंग कंपनी आहे. दरम्यान रिलायंस आणि लोटल कंपनीमध्ये झालेल्या डीलची घोषणा २९ डिसेंबर २०२२ मध्येच करण्यात आली होती.

या डीलमध्ये रिलायंस कंज्यूमर प्रोडक्ट्स लिमिटेड, लोटस चॉकलेट कंपनी लिमिटेड यांच्यातील डीलसाठी सुरुवातीला ११३ रुपये प्रति शेअर चा भाव ठरवण्यात आला होता. याच रेटने प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. लोटस या कंपनीची स्थापना १९८८ मध्ये करण्यात आली होती. ही कोका आणि चॉकलेट प्रोडक्ट्स सप्लाय करते.

मुकेश अंबानी यांच्या रिलायंसोबत डील पूर्ण झाल्याच्या बातमीसोबतच या चॉकलेट कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली. गुरुवारी बाजार बंद होतेवेळी लोटस चॉकलेट कंपनी लि. चे शेअर्स १.८२ टक्के वाढून १४८ वर बंद झाले. जेव्हा या डीलची घोषणा झाल्यानंतर देखील शेअर्समध्ये तेजी दिसून आली होती. इतकेच नाही तर लोटस चॉकलेट कंपनीने मार्च २०२२ मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात ६ कोटी रुपयांचा नेट प्रॉफिट कमावला होता.तर कंपनीने ८७ कोटी रुपयांची विक्री केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पूरग्रस्तांसाठी ५ रुपये मागितले तर..., शेतकऱ्यांकडून वसुलीच्या टीकेवर मुख्यमंत्री फडणवीस कडाडले; कारखान्यांना इशारा

Kolhapur Accident : संतोष आणि मोहम्मद जिवलग मित्र पण नियतीच्या मनात वेगळ होतं..., दुचाकींच्या धडकेत दोघे मित्र ठार

Latest Marathi News Live Update: छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्गावर अर्धा तास रस्ता रोको आंदोलन

Bachchu Kadu : 'शेतकरी एकत्र येत नाही, हाच सर्वांत मोठा शोक'; बच्चू कडूंचा सरकारवर घणाघात

Kolhapur Police : पोलिस अधिकाऱ्याच्या गळ्यातील ताईत डिपार्टमेंट बदनाम करतोय, मोका प्रस्ताव रद्द करण्यासाठी ६५ लाखांची केली मागणी अन्...

SCROLL FOR NEXT