Mukesh Ambani esakal
देश

Mukesh Ambani : Reliance समूह प्रत्येक गावात 5G सेवा, JIO शाळा सुरु करणार; अंबानींची मोठी घोषणा

प्रत्येक गावात 5G सेवा (5G Services) पोहोचवण्यासाठी अंबानींनी पुढील चार वर्षांत 75,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली.

सकाळ डिजिटल टीम

रिलायन्सनं राज्यातील गावं आणि लहान शहरांमध्ये परवडणारं शिक्षण आणि आरोग्यसेवेसाठी जिओ प्लॅटफॉर्मद्वारे जिओ-स्कूल आणि जिओ-एआय-डॉक्टर या दोन प्रकल्पांची घोषणा केली.

लखनौ : अब्जाधीश मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी आज (शुक्रवार) यूपी ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटमध्ये (UP Global Investors Summit) मोठी घोषणा केली.

प्रत्येक गावात 5G सेवा (5G Services) पोहोचवण्यासाठी आणि दूरसंचार नेटवर्कचा विस्तार वाढवण्यासाठी अंबानींनी पुढील चार वर्षांत 75,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली. या गुंतवणुकीतून सुमारे 1 लाख नवीन रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

लखनौ इथं आयोजित यूपी ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटमध्ये बोलताना मुकेश अंबानींनी दावा केला की, 5 वर्षात उत्तर प्रदेश 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनेल. तर, जिओ डिसेंबर 2023 पर्यंत राज्यभरात 5G सेवा सुरू करेल. याशिवाय, दूरसंचार समूह 10 GW नूतनीकरणक्षम क्षमतेची स्थापना करेल आणि राज्यात जैव-ऊर्जा व्यवसाय सुरू करेल, असंही ते म्हणाले.

रिलायन्सनं राज्यातील गावं आणि लहान शहरांमध्ये परवडणारं शिक्षण आणि आरोग्यसेवेसाठी जिओ प्लॅटफॉर्मद्वारे जिओ-स्कूल आणि जिओ-एआय-डॉक्टर या दोन प्रकल्पांची घोषणा केली. यासोबतच अंबानींनी उत्तर प्रदेशातील कृषी आणि बिगर कृषी उत्पादन अनेक पटीनं वाढवण्याचा मानस व्यक्त केला. याचा फायदा शेतकरी, स्थानिक कारागीर, लघु आणि मध्यम उद्योगांना होणार आहे. मुकेश अंबानींनी 2023 च्या अखेरीस यूपीच्या सर्व शहरांमध्ये 5G सेवा सुरु होईल, असंही सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India WTC Final Scenario: टीम इंडिया फायनलमध्ये जाणार की नाही? ICC ने सोपं गणित मांडून गुंता सोडवला की वाढवला?

Jalgaon Gold And Silver Price : खिसा रिकामा होणार! डिसेंबरच्या २१ दिवसांतच सोने ५५०० रुपयांनी तर चांदी २७ हजारांनी महागली

Viral Video: इथं कधीही फोटो काढू नका… क्षणात गिळंकृत करणारा पृथ्वीवरील जीवघेणा स्पॉट, इथं उभं राहणंही धोकादायक

Latest Marathi News Live Update : ग्रँड रोडवरील भाटिया रुग्णालयात अंडरग्राउंड भागात आग लागली; रुग्ण सुरक्षित स्थलांतरित

Kolhapur Muncipal : चार सदस्यीय प्रभागात प्रथमच नवे मतदान तंत्र; रंगनिहाय उमेदवारांची नावे मतदान यंत्रावर

SCROLL FOR NEXT