देश

कॉर्पोरेट किंवा कराराने शेती करत नाही : मुकेश अंबानी

वृत्तसंस्था

चंडीगड - नवीन कृषी कायद्यांचा कंपनीशी काही संबंध नव्हता आणि नाही तसेच कंपनीला त्यापासून कोणतेही फायदे नाहीत. तसेच रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, रिलायन्स रिटेल लिमिटेड (आरआरएल), रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड (आरजेआयएल) आणि रिलायन्सशी संबंधित कोणतीही अन्य कंपनी कॉर्पोरेट किंवा कराराने शेती करत नाही किंवा करवत नाही, असे स्पष्टीकरण रिलायन्स इंडस्ट्रीजने आज दिले. 

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने (आरआयएल) साहाय्यक कंपनी जिओ इन्फोकॉममार्फत पंजाब व हरियाना उच्च न्यायालयात आज याचिका दाखल केली. शेतकऱ्यांनी केलेल्या तोडफोडीला आळा घालण्याची विनंती त्यांनी याचिकेद्वारे केली आहे. ‘कॉर्पोरेट’ किंवा काँट्रॅक्ट शेतीसाठी रिलायन्स किंवा रिलायन्सच्या साहाय्यक कंपनीने हरियाना, पंजाब किंवा देशातील अन्य कोणत्याही भागात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या जमीन खरेदी केलेली नाही. तसे करण्याची योजनाही नाही, असेही त्यांनी याचिकेत म्हटले आहे. 

रिलायन्स रिटेल ही संघटित रिटेल क्षेत्रातील एक कंपनी आहे आणि वेगवेगळ्या कंपन्यांची निरनिराळी उत्पादने त्यामार्फत विकली जातात, पण ती कंपनी थेट शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करत नाही किंवा शेतकऱ्यांशी दीर्घकालीन खरेदी करारामध्ये कंपनीचा सहभाग नाही, असेही कंपनीने दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे. 

दंगलखोरांनी केलेली तोडफोड आणि हिंसक कारवायांनी रिलायन्सशी संबंधित हजारो कर्मचाऱ्यांचे जीवन धोक्यात आले आहे. तसेच पायाभूत सुविधा, विक्री आणि सेवा दुकानांची रोजची कामे धोक्यात आली आहेत, असेही रिलायन्सने म्हटले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Election 2026 LIVE Update : पुण्यात बंद पडलेलं मशीन एक तासानंतर सुरू; एक तासाचा वेळ वाढवून देण्याची निवडणूक अधिकाऱ्यांची ग्वाही

Pune Municipal Voting : मतदान केलं… पण मत कुणाला गेलं कळेना! पुण्यात मतदान केंद्रावर मोठा गोंधळ, मतदार चक्रावले!

Pune Municipal Election : मदतीला धावून येणाऱ्यांना मत; पुण्यात स्थायिक झालेल्या परराज्यातील नागरिकांची भावना

Pimpri Accident : दुचाकीवरील दोन बहिणी भरधाव ट्रकच्या धडकेत मृत्युमुखी; आई-वडिलांनी गमावला आधार

Pandharpur News: पंढरीत महिला भाविकांची गर्दी; मकर संक्रांतीनिमित्त ७० हजारांहून अधिक महिलांकडून दर्शन!

SCROLL FOR NEXT