Mukesh Khanna| Ram Mandir| BJP| Ayodhya Esakal
देश

Ayodhya: भव्य राम मंदिरासह लोकांचे आयुष्यही... शक्तिमानची उलटी गिरकी, भाजपला फटकारले

Mukesh Khanna: भाजप एनडीएसोबत देशात तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे. पण २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला अनेक प्रतिष्ठीत जागांवर पराभवाचा सामना करावा लागला.

आशुतोष मसगौंडे

भारतीय जनता पक्ष एनडीए आघाडीसोबत देशात तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे. पण २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला अनेक प्रतिष्ठीत जागांवर पराभवाचा सामना करावा लागला.

यामध्ये उत्तर प्रदेशातील फैजाबाद (अयोध्या) लोकसभा जागेवर भाजपला पराभवाची चव चाखायला लागली. आयोध्येत राम मंदिर उभारणी सुरू असताना भाजपचा पराभवभ झाल्याने याची सर्वत्र चर्चा होत आहे.

दरम्यान यावरुन शक्तिमानची भूमिका साकारत प्रसिद्ध झालेले अभिनेत मुकेश खन्ना यांनी भारतीय जनता पक्षाला फटकारले आहे.

यावर आता अभिनेते मुकेश खन्ना आपली प्रतिक्रिया देताना म्हणाले, अयोध्येत भाजप पराभूत असे कोणालाच वाटले नव्हते.

रुवारी मुकेश खन्ना यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर यावर एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये राम मंदिराच्या फोटोसह कॅप्शनमध्ये लिहिले की, "अयोध्येतील लोकसभा निवडणुकीतील पराभवातून धडा घेण्याची गरज आहे की, भव्य मंदिर बांधण्याबरोबरच आसपासच्या शहरवासीयांचे जीवनही भव्य बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कोटयवधींच्या बजेटपैकी तेथील लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी काही कोटी खर्च करणे आवश्यक आहे. राम मंदिर असो, चार धाम असो किंवा खातू श्याम मंदिर असो. धार्मिक स्थळ अजिबात पर्यटन स्थळ होऊ देऊ नका. तिथे राहणाऱ्या लोकांचीही विशेष काळजी घेतली पाहिजे."

अभिनेता म्हणून, मुकेश खन्ना यांनी सनम वेबफा आणि तहलका सारख्या अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम करत आपल्या अभिनयाचा ठसा उमठवला आहे. मात्र दूरदर्शनवरील 'शक्तिमान' या सुपरहिरो मालिकेतील भूमिका साकारून अनेक दशके झाली तरी ते अजूनही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.

मुकेश खन्ना यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याआधीही मुकेश सोशल मीडियावर देश आणि इंडस्ट्रीशी संबंधित मुद्द्यांवर आपले मत मांडताना दिसले आहेत. यामुळे ते अनेकदा अडचणीत सापडले आहेत. मुकेश खन्ना केवळ इंस्टाग्रामवरच प्रसिद्ध नाहीत तर यासोबतच ते त्यांच्या 'भीष्म इंटरनॅशनल' या यूट्यूब चॅनलवरही खूप सक्रिय आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vanraj Andekar vs Govind Komkar: नाना पेठेत थरार! वर्षभरानंतर बदला घेतला, नेमकं काय होतं वनराज आंदेकर प्रकरण?

Bhagwant Mann health Update: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती खालावली ; मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल!

Pro Kabaddi: बेंगळुरू बुल्सची बत्तीगुल! यू मुंबाचा ४८-२८ ने एकतर्फी विजय; अजित चौहान ठरला सामन्याचा हिरो

Mira Bhayandar: पाच हजार कोटींचं ड्रग्ज जप्त, मीरा भाईंदर पोलिसांची मोठी कारवाई

Pune Crime: वनराज आंदेकरांच्या खुनाचा बदला! गोविंदा कोमकरची तीन गोळ्या झाडून हत्या; पुणं हादरलं

SCROLL FOR NEXT